EKI Energy Services: शेअर मार्केटमध्ये इतिहास रचलेली बीसीई एसएमई लिस्टेड कंपनी

२०११ साली स्थापन झालेली इकेआय एनर्जी सर्व्हिसेेस (EKI Energy Services) ही भारतातील कार्बन क्रेडिट इंडस्ट्रीमधील सर्वांत मोठी कंपनी आहे. क्लायमेट चेंज अॅडवायजरी, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिजनेस एक्सिलंस एडवायजरी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटसारख्या सेवा या कंपनीकडून दिल्या जातात.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये स्मॉल अॅण्ड मीडियम एंटरप्रायजेस ( SME)च्या इंडेक्स लिस्टेड असलेल्या या कंपनीने शेअर मार्केटमध्ये इतिहास रचला आहे. जानेवारीमध्ये या कंपनीचे बाजारमूल्य १ अरब डॉलर एवढे पोचले होते. ही एकमेव BSE SME लिस्टेड कंपनी अशी आहे ज्या कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात वॅल्युएशन कमावले आहे. या कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना सहा हजार टक्के परतावा दिला आहे.

इकेआय एनर्जी या कंपनीच्या शेअर्सची किंमत एप्रिल २०२१ मध्ये १४७ रुपये होती. तर ४ जानेवारी २०२२ रोजी या शेअरची किंमत ९ हजार ९०३ रुपये झाली. म्हणजे वर्षभरात या कंपनीने तब्बल ६ हजार ६३७ टक्के परतावा दिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज (२१ फेब्रुवारी २०२२) या कंपनीच्या शेअरची किंमत ८ हजार २८४ रुपये आहे.

कंपनीची स्थापना २०११ साली होती, तेव्हापासून या कंपनीने नेहमीच प्रगती साधली आहे. एप्रिल २०२१ साली या कंपनीचा आयपीओ आला होता. या कंपनीने जवळपास १८० मिलिअन रुपये या आयपीओतून कमावले होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत सतत वाढ होत होती.

गेल्या १२ वर्षांपासून ही कंपनी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी काम करत आहे. तसेच इन्किंग इंटरनॅशनल नावाने जगभरात व्यवसाय करत आहे. TPC, NHPC, Indian Oil Corporation, Indian Railways, SB Energy, The World Bank, आणि Fortum सह 2 हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत.

Scroll to Top