Home / अर्थ मित्र / Tata motors:अखेर टाटा मोटर्सचे विभाजन झाले !कोसळणार्‍या शेअरना आणखी धक्का

Tata motors:अखेर टाटा मोटर्सचे विभाजन झाले !कोसळणार्‍या शेअरना आणखी धक्का

Tata motors- मागील काही महिने चर्चेत असलेले टाटा मोटर्स (tata motors) कंपनीचे विभाजन आता पूर्ण झाले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी...

By: Team Navakal
tata motors

 Tata motors- मागील काही महिने चर्चेत असलेले टाटा मोटर्स (tata motors) कंपनीचे विभाजन आता पूर्ण झाले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी वापरावयाची वाहने आणि मालाची ने-आण करण्यासाठी वापरावयाची व्यावसायिक वाहने या श्रेणीत टाटा मोटर्स दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागले आहे. टाटा मोटर्सचे समभाग काही दिवसांपूर्वी 40 टक्क्यांनी कोसळले. आता या विभाजनाच्या प्रक्रियेनंतर आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे.


टाटा मोटर्सचे विभाजन होऊन टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स (टीएमपीव्ही) आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स (टीएमएलसीव्ही) अशा दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. टीएमपीव्हीच्या समभागांची किंमत प्रति समभाग 400 रुपये निश्चित करण्यात आली असून टीएमएलसीव्हीचे दर्शनी मूल्य 2 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले आहे.


मात्र विभाजनानंतर निर्माण झालेल्या प्रवासी कार कंपनीची अद्याप मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी झालेली नाही. येत्या काही आठवड्यात दोन्ही प्रमुख शेअर बाजारांमध्ये टीएमएलसीव्हीची नोंदणी केली जाणार आहे. व्यवस्थापनाने विभाजनापूर्वीच्या टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी एकास एक समभाग असे सूत्र निश्चित केले आहे. म्हणजे  भागधारकाकडे टाटा मोटर्सचे जेवढे समभाग असतील तेवढेच टीएमएलसीव्हीचे समभाग भागधारकांना देण्यात येणार आहेत. काही पात्र भागधारकांच्या डीमॅट खात्यात टीएमएलसीव्हीचे समभाग वळतेही करण्यात आले आहे. मात्र शेअर बाजारांमध्ये टीएमएलसीव्हीची रितसर नोंदणी होईपर्यंत हे समभाग निष्क्रिय असणार आहेत. म्हणजेच या समभागांची खरेदी-विक्री करता येणार नाही. नोंदणी झाल्यानंतर टीएमएलसीव्हीच्या समभागांची किंमत ठरवली जाणार आहे. तोपर्यंत शेअर किमतीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा

ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाला गती सर्व परवानग्या मंजूर !अडथळे दूर

कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे देहू येथे लाक्षणिक उपोषण

’शोले’चे ‘जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या