एचडीएफसी बँकेने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले

एचडीएफसी बँकेने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हीही फिक्स डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर एचडीएफसी बँक चांगला पर्याय ठरू शकेल. बँकेनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन याबाबतची माहिती जारी केली आहे. आरबीआयकडून रेपो रेट आणि इतर बाबी स्थिर ठेवण्यात आल्यामुळे एचडीएफसीनं आपल्या एफडीच्या इंटरेस्टमध्ये वाढ गेली आहे.

दोन कोटीपेक्षा कमी रक्कमेच्या एफडीवर १० पॉईंट्सने वाढ करून व्याजकर ५ टक्के केला आहे. याआधी व्याजदर ४.९ टक्के इतका होता. एवढेच नव्हे तर तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्यांना आता 5.45 टक्के इतका इंटरेस्ट रेट मिळणार आहे. १४ फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे.

या आधी बँकेनं जानेवारीत दोन वर्षांपेक्षा जास्त ते तीन वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्यांना 5.3 टक्के तर 3 वर्षांपेक्षा जास्त ते 5 वर्षांपेक्षा जास्त एफडी करणाऱ्यांना 5.4 टक्के तर पाच वर्षांपेक्षा जास्त ते 10 वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्यांना 5.6 टक्के व्याजदर देण्याचं जाहीर केलं होतं.

दरम्यान, एसबीआय बँकेनेही मध्यंतरी फिस्क डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली होती. त्यानुसार 2 कोटीपर्यंत रिटेल टर्म डिपॉझिट 2 वर्ष+ ते 3 वर्ष केल्यास 5.30 टक्के व्याजदर मिळेल. हा व्याजदर याआधी 5.10 टक्के इतकाच होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. तर 3+ वर्ष ते 5 वर्ष डिपॉझिट केल्यास 5.45 टक्के व्याजदर मिळेल. तर दुसरीकडे 5+ वर्ष ते 10 वर्ष डिपॉझिट केल्यास 5.50 टक्के व्याजदर मिळेल.

Scroll to Top