Home / अर्थ मित्र / आता ICICI बँकेनेही वाढवले मुदत ठेवींवरील व्याजदर

आता ICICI बँकेनेही वाढवले मुदत ठेवींवरील व्याजदर

आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केल आहे. याआधी एसबीआय आणि एचडीएफसी बँकेने व्याजदरांत वाढ केली होती. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेने...

आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केल आहे. याआधी एसबीआय आणि एचडीएफसी बँकेने व्याजदरांत वाढ केली होती. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेने नवे दर लागू केले आहेत. दोन कोटी रुपयांहून अधिक ते पाच कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ झाली असून वाढीव मुदत ठेव दर विविध मॅच्युरिटी कालावधी असलेल्या खात्यांवर लागू होतात. 

नियमित आणि ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना आयसीआय़सीआय बँक समान व्याजदर देते. १० मार्चपासून हे नवे सुधारित व्याजदर लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच, बँक आता तीन वर्ष  ते 10 वर्षांच्या मुदतीच्या कालावधीसह FD खात्यांवर 4.6% व्याज दर देत आहे. गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर 4.50% व्याज दराने दोन वर्षांपेक्षा जास्त ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या रकमेवर परतावा मिळू शकतो. 

जर, तुम्ही ICICI बँकेत एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी FD केल्यास, तुम्हाला 2.5% ते 3.7% पर्यंत व्याजदराने परतावा मिळेल. ICICI बँक 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 4.2% व्याज दर देते तर, गुंतवणूकदारांना 18 महिन्यांपेक्षा जास्त ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD पॉलिसींवर 4.3% परतावा मिळू शकतो. 

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या