नवा व्यवसाय सुरु करायचाय? पीएनबी बँक देतेय ग्राहकांना तत्काळ कर्ज

जर तुम्हाला स्टार्टअपसाठी किंवा व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असेल आणि तुमचे पीएनबी बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण एका फोनकॉलवर तुम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकेल. पीएनबी बँकेने ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगारांनी स्टार्टअपचा पर्याय अवलंबला आहे. मात्र, कोणत्याही गॅरंटीशिवाय कोणतीही बँक कर्ज देत नाही. त्यामुळे पीएनबी बँकेने अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने त्यांच्या ग्राहकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखली आहे. याअंतर्गत नव्या व्यवसायासाठी, व्यवसाय वाढीसाठी, शिक्ष।णासाठी तुम्ही तत्काळ कर्ज घेऊ शकता.

कर्ज मिळवण्याकरता तुम्ही 1800-180-2222 किंवा 1800-103-2222 या क्रमांकावर संपर्क साधल्यास तुम्हाला तत्काळ माहिती उपलब्ध होईल. तसेच, तुम्ही https://www.pnbindia.in/loans.html या संकेतस्थळावर जाऊनही कर्ज घेण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकाल.

याव्यतिरिक्त मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएममार्फत कर्जासाठी अप्लाय करता येऊ शकतं. याव्यतिरिक्त तुम्ही मिस्ड कॉलमार्फत कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेचा टोल फ्री नंबर 1800-180-5555 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. येथे तुम्हाला कर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.

Scroll to Top