JSW Steel Shares | सध्याच्या काळात प्रत्येकजण झटपट पैसे कमवण्याचा मार्ग शोधत असतो. क्रिप्टो, शेअर मार्केटच्या माध्यमातून लवकरात लवकर कोट्यावधी रुपये कमवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, गुंतवणूक जेवढी दीर्घकाळासाठी असेल, तेवढा अधिकच फायदा होत असतो. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. एका व्यक्तीला 30 वर्षांपूर्वी खरेदी केलेले जेएसडब्ल्यू कंपनीचे शेअर्स सापडल्याने रातोरात नशीबच पालटले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, एका तरुणाला त्याच्या वडिलांनी 1990 च्या दशकात 1 लाख रुपयांना घेतलेल्या JSW Steel च्या शेअर्सची सर्टिफिकेट्स सापडली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांची आजची किंमत जवळपास ₹80 कोटी रुपये इतकी आहे!
सौरभ दत्ता नावाच्या एका यूजरने ‘एक्स’ (ट्विटर) वर याबातची माहिती शेअर केली आहे त्यांनी जिंदाल विजयनगर स्टील (Jindal Vijayanagar Steel) चे मूळ शेअर सर्टिफिकेट्स पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. दत्ता यांच्या मते, “योग्य वेळी खरेदी आणि दीर्घकाळ धीर बाळगणे” ही गुंतवणुकीची खरी गुरुकिल्ली आहे.
Guy on Reddit discovered JSW shares bought by his dad in the 1990s for ₹1L.
— Sourav Dutta (@Dutta_Souravd) June 7, 2025
Worth ₹80Cr today.
Power of buy right sell after 30yrs. pic.twitter.com/mZTpGt4LII
JSW Steel च्या शेअर्सची किंमत सध्या 1,003.20 रुपये आहे. हेच शेअर्स 30 वर्षांपूर्वी 1 लाखात खरेदी करण्यात आले होते. आज या शेअर्सची किंमत जवळपास 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक यूजर्स यावर प्रतिक्रिया देत दीर्घकाळ गुंतवणूक करणे हाच संपत्ती जमवण्याचा मार्ग असल्याचे मत व्यक्त करत आहेत.