KPR Mill Ltd : वस्त्रोद्योगातील नावाजलेली कंपनी

सुत, फॅब्रिक, गरमेंट्स, आणि व्हाईट क्रिस्टल शुगर सारख्या उत्पादनाची निर्मिती करणारी KPR मिल ही कंपनी भारतातील महत्वाची कंपनी आहे. वस्त्रोद्योगात गेल्या ४० वर्षांपासून या कंपनीने महत्त्वपूर्ण काम केलं आहे. या कंपनीचे मुख्यालय कोइंबतूर येथे आहे.

विणलेले कपडे, विविध प्रकारचे फॅब्रिक्सच्या उत्पादनासाठी ही कंपनी जागतिक पातळीवर ओळखली जाते. या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे या कंपनीमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा असून उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या कंपनीच्या उत्पादनाच्या दर्जामुळे ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारातही नावाजलेली आहे.

महत्वाचे म्हणजे या कंपनीचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून वधारत आहेत. गेल्या तीन वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या आठवड्याभरात या कंपनीचे शेअर्स ८.९७ टक्क्यांनी वाढले असून गेल्या तीन वर्षात या कंपनीने ५८८ टक्के नफा मिळवून दिला आहे.

Scroll to Top