BBNL आणि BSNL कंपन्यांचे विलिनीकरण होणार, १ एप्रिलपासून एकत्र कामकाजाला सुरूवात

भारत सरकारची तोट्यात असलेली टेलिकॉम कंपनी भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेड (BBNL) ही कंपनी १ एप्रिलपासून भारत संचार निगम लिमिटेडसोबत (BSNL) एकत्र काम करणार आहे. विलिनीकरणाची ही प्रक्रिया असून कामाचे विभाजनही करून घेणार आहेत. बीएसएनएल कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार यांनी याबाबतची माहिती दिली.

जून २०२२ पर्यंत या दोन्ही कंपन्याच्या विलिनीकरणाचं काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्या आपपाल्या कामाची जबाबदारी काय असणार यासाठी प्रयत्न करत आहेत. या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण झाल्याने बीबीएनएलची सर्व कामे बीएसएनल कंपनीला मिळणार आहे. त्यामुळे 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबर नेटवर्कची सगळी जबाबदारी ही बीएसएनएल कंपनीजवळच असणार आहे.

या विलिनीकरणामुळे फायबर केबल्स नेटवर्क आधारित ब्रॉडबँड कनेक्शन दिले जाणार आहे. बीएसएनएलजवळ प्रचंड मोठे नेटवर्क मिळणार असल्याने त्यांना हे सहज शक्य होणार आहे. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड किंवा USOF च्या माध्यमातून BSNL ला या केबलचे नियंत्रण दिले जाणार आहे.

गाव आणि पंचायत क्षेत्रामध्ये ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे पसरवण्यासाठी फेब्रुवारी २०१२ मध्ये बीबीएनएल कंपनीची निर्मिती करण्यात आली होती. या कंपनीला USOF कंपनी सहाय्य करत होती. याच कंपनीच्या फंडातून ग्रामीाण भागात केबल टाकण्याचे काम करण्यात आले. BBNL या कंपनीला ग्रामीण भागातील 2.5 लाख पंचायत कार्यक्षेत्रामध्ये फायबर केबल पसरवण्याचे काम मिळाले होते.

Scroll to Top