SBI, PNB, ICICI, BOB बँकांचे नियम बदलले; लगेच जाणून घ्या!

१ फेब्रुवारीपासून अनेक बँकांचे नियम बदलले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आदी बँकाचेही काही नियम बदलण्यात आले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना पैसे ट्रान्स्फर करताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने 1 फेब्रुवारी 2022 पासून आयएमपीएस व्यवहारांमध्ये (IMPS) एक स्लॅब जोडला आहे. हा स्लॅब 2 ते 5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यानुसार 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम शाखेतून IMPS द्वारे पाठवल्यानंतर त्यावर 20 रुपये शुल्क आणि GST आकारला जाईल. 

तर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना प्रत्येक व्यवहारासाठी आता २.५० टक्के शुल्क भरावे लागणार आहे. तसेच चेक किंवा ऑटो डेबिट रिटर्न साठी संपूर्ण रकमेवर २ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर ग्राहकांच्या खात्यातून ५० रुपये GST कापला जाणार आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये चेक क्लिअरन्सचे नियम बदलण्यात आले आहेत. चेक पेमेंटसाठी ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीम फॉलो करावी लागणार आहे. म्हणजेच ग्राहकांना चेक दिल्यानंतर त्या चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. तसे न झाल्यास चेक परत केला जाऊ शकतो. हे नियम 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकवर लागू होतील. ही माहिती SMS, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे (ATM) दिली जाऊ शकते. 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी हा नियम आहे.

तुमच्या खात्यात पैसे नसतील किंवा तुमचा हप्ता चुकला तर १ फेब्रुवारीपासून पंजाब नॅशनल बँकेतील ग्राहकांना २५० रुपये दंड भरावा लागणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्कम 100 रुपये होती. याशिवाय डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यास आता 100 ऐवजी 150 रुपये भरावे लागणार आहेत.

Scroll to Top