Yes Bank | येस बँकेची होणार विक्री? जपानची ‘ही’ कंपनी मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत

Yes Bank

SMBC Eyes Controlling Stake in Yes Bank | दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या येस बँकेशी संबंधित मोठी समोर आली आहे. सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (Sumitomo Mitsui Banking Corporation) या जपानी वित्तीय संस्थेने पुन्हा एकदा नियंत्रक भागीदारी (Controlling Stake) खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

ही माहिती समोर आल्यानंतर येस बँकेचे शेअर्स (Shares) खरेदी करण्यासाठी शेअर बाजारात (Share Market) खळबळ उडाली. बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

रिपोर्टनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (State Bank of India – SBI) सध्या येस बँकेत आपली सुमारे 23.97% हिस्सेदारी आहे आणि त्यातील सुमारे 20% हिस्सा SMBC ला विकण्याच्या प्रक्रियेत आहे. जर हा व्यवहार पूर्ण झाला, तर SBI येस बँकेतून जवळपास पूर्णतः बाहेर पडेल.

येस बँकेच्या अडचणीच्या काळात 2020 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India – RBI) मार्गदर्शनानुसार SBI आणि इतर काही बँकांनी तरलता संकट (Liquidity Crisis) टाळण्यासाठी मदत केली होती. मात्र, आता येस बँक स्थिर वाटू लागल्याने अनेक संस्थांनी आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

सूSMBC या व्यवहाराच्या पुढील टप्प्यात येस बँकेत 6-7% नव्याने भांडवल गुंतवणूक करू शकते. त्यानंतर SMBC 51% पर्यंत हिस्सेदारी मिळवण्यासाठी ओपन ऑफर आणण्याच्या तयारीत आहे. या खुल्या ऑफरमध्ये SBI, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक (, आयसीआयसीआय बँक, आणि एचडीएफसी बँक देखील आपापला हिस्सा विकू शकतात. या चार बँकांकडे एकत्र 7.36% हिस्सेदारी आहे.

त्याचप्रमाणे, ॲडव्हेंट इंटरनॅशनल आणि कार्लाइल ग्रुप यांच्याकडे मिळून 16% हिस्सा आहे आणि त्यांचाही समावेश या व्यवहारात होऊ शकतो. एलआयसी कडे सध्या 3.98% हिस्सा आहे.

सध्या SMBC कडून सर्व प्रक्रिया भारतीय नियमांनुसार पार पाडली जात आहे. यापूर्वी SMBC ला 50% पेक्षा अधिक वोटिंग राइट्स (Voting Rights) हवे होते, परंतु भारतीय कायद्यानुसार कोणत्याही खासगी बँकेत प्रवर्तकाकडे 26% पेक्षा अधिक मतदान अधिकार असू शकत नाहीत. आता SMBC या नियमांचा स्वीकार करत असून, त्यानुसार गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.

दरम्यान, येस बँकेने एका अधिकृत निवेदनात सांगितले की, बँक नेहमीच मूल्यनिर्मितीसाठी सर्व भागधारकांशी चर्चा करत असते. सध्या सुरू असलेल्या चर्चा प्राथमिक टप्प्यावर आहेत आणि कोणताही अधिकृत खुलासा आवश्यक नाही.

Share:

More Posts