टाटा पॉवरच्या २९ रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

टाटा समूहातील टाटा पॉवर या कंपनीने २ वर्षातच जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स २९ रुपयांवरून थेट २३० रुपयांवर पोहोचले आहेत.

८ मे २०२० रोजी या कंपनीचे शेअर २८.२५ रुपये होता. त्यानंतर १७ मार्च २०२२ रोजी जाच शेअर २३२.१० रुपये झाला. म्हणजेच ८ मे २०२० रोजी जर कोणी १ लाखांची गुंतवणूक केली असती तर त्याला आज ८ लाख रुपये मिळाले असते. त्याला २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ७ लाख रुपयांचा नफा झाला असेल, असे म्हटले जात आहे.

टाटा पॉवरचा शेअर ४ ऑक्टोबर २००२ साली शेअर बाजारात लिस्टेड झाला होता. त्यावेळी त्याची किंमत ९.१९ रुपये होती. आता टाटा पॉवरचा हाच शेअर २३०.२० रुपयांच्या पातळीवर आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना दोन हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने ४ ऑक्टोबर २००२ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता हे पैसे २५.०४ लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. म्हणजेच गुंतवणुकीवर २४ लाख रुपयांचा थेट नफा झाला असता. विशेष म्हणजे टाटा पॉवरचे मार्केट कॅप सुमारे ७३ हजार ५८० कोटी रुपये आहे.

Scroll to Top