Home / White Collar Voice / सुट्टीचे खरे कारण सांगितले, तरी नोकरी धोक्यात का येते ?

सुट्टीचे खरे कारण सांगितले, तरी नोकरी धोक्यात का येते ?

अलीकडे एक कर्मचारी आणि त्याचा बाॅस यांच्यातील चॅट खूप व्हायरल झाला आहे. तो कर्मचारी सांगतो की आमच्या येथे सोमवारी वीज...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA
Boss scolding employee

अलीकडे एक कर्मचारी आणि त्याचा बाॅस यांच्यातील चॅट खूप व्हायरल झाला आहे. तो कर्मचारी सांगतो की आमच्या येथे सोमवारी वीज खंडित होणार आहे, वीजपुरवठा येत जात राहील, त्यामुळे त्या दिवशी मी काम करू शकणार नाही. त्यावर त्याचा मालक त्याला फटकारतो आणि म्हणतो की तुला सुट्टी घ्यायला परवानगी नाही आणि सुट्टीसाठी पुन्हा मागणी करीत राहिलास तर तू कामावरून पळून गेला आहेस असे मी समजेन.

मालकाच्या या उत्तराने चिडून जाऊन त्या कर्मचाऱ्याने नोकरीच सोडली. पण नोकरी सोडणे हा पर्याय सर्वांकडे नसतो, अशांनी काय करायचे, सुट्टी का मागितली त्याचे खरे कारण सांगितल्यावर ही वागणूक मिळत असेल तर मग खोटे काही सांगण्याकडे कल वाढतो, मालकाने थोडे समजून तरी घ्यावे, निदान त्यावर चर्चा केली तरी कर्मचाऱ्याला बरे वाटते, काही मार्ग निघू शकतो, पण एकदम दुसरे टोक गाठतात त्यामुळे संताप येतो, कुणाशी याबद्दल बोलावे हेही कळत नाही.

आता होळीचा सण आहे, त्या दिवशी ज्यांना सुट्टी हवी असेल ते काय कारणे सांगतील? घरी कुणी वारले म्हणतील की आजारी आहे सांगत डाॅक्टरची खोटी चिठ्ठी दाखवतील. कुणीतरी आणखी नवी कल्पना काढेल. ट्रेकिंगला जायचे सांगितले तर चालणार नाही, सोसायटीत रंग लावतात सांगितले तर पटणार नाही, कोणती कारणे चालतील याचे कुणीतरी संशोधन करून माहिती दिली पाहिजे, त्यासाठी मालकाच्या डोक्यात शिरून तो कसा विचार करतो त्याचा अंदाज घ्यावा लागेल. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूळवड असते म्हणून एकाने दोन दिवस सुट्टी मागितली तर त्याला सांगितले सलग सुट्टी घ्यायची नाही?

मग कुठे जायचे तर एक दिवसात हेलिकाॅप्टरने जाऊन यायचे का? आणि हेलिकाॅप्टरने जाण्याइतके पैसे असते तर ही नोकरी कशाला केली असती, आम्हाला वर्षाला २० / ३० सुट्ट्या असतात त्या घ्यायचा आम्हाला अधिकार आहे ना? वर्षातून एकदा १५ दिवस सुट्टी मागितली तर मंजूर करायला हवी, पण यांना तर सलग २ दिवस सुट्टी मागितली तर अडचण होते. नोकरीवरून काढतील म्हणून गप्प बसून ऐकायची यांची बाॅसगिरी, दुसरा पर्याय आहे काही?

कुणी सांगा!

WhiteCollarVoice.com वर यासारखे अधिक लेख वाचा.

Web Title:
संबंधित बातम्या