Home / क्रीडा / दिव्यांग क्रिकेटपटूचे रेल्वेप्रवासात निधन

दिव्यांग क्रिकेटपटूचे रेल्वेप्रवासात निधन

मथुरा– दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग याचे काल लुधियाना ते ग्वालियर रेल्वेप्रवासात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. विक्रम हा व्हीलचेयर वरुन क्रिकेट...

By: Team Navakal


मथुरा– दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग याचे काल लुधियाना ते ग्वालियर रेल्वेप्रवासात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. विक्रम हा व्हीलचेयर वरुन क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध होता.
विक्रम व त्याचे सहकारी क्रिकेटपटू ग्वालियर येथील ७ व्या श्रीमंत माधवराव शिंदे स्मृती टी-१० क्रिकेट स्पर्धेसाठी जात होते. त्यांची रेल्वे दिल्लीहून जात असताना विक्रमला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याची तब्येत बिघडतच गेली व मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावर गाडी येण्याआधी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अवस्थेची माहिती त्याच्या सहकारी खेळाडूंनी रेल्वे पोलिसांना दिली होती, मात्र त्यांच्याकडून काहीही हालचाल करण्यात आली नाही. त्याला जर वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असे त्याच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे. रेल्वे पोलिसांना तीन तासपर्यंत फोन करुनही त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद देण्यात आला ना

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या