Home / क्रीडा / भारताविरुद्धच्या सामन्याआधीच पाककडून घडली मोठी चूक, नक्की काय घडले? वाचा

भारताविरुद्धच्या सामन्याआधीच पाककडून घडली मोठी चूक, नक्की काय घडले? वाचा

Indian National Anthem Played In Lahore | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा सुरू आहे. यंदाचे स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. मात्र, पाकिस्तानात जाण्यास...

By: Team Navakal

Indian National Anthem Played In Lahore | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा सुरू आहे. यंदाचे स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. मात्र, पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने भारताचे सामने दुबईत खेळले जात आहेत. यातच आता शनिवारी (22 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा सामना सुरू होण्यापूर्वी असे काही घडले की, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवले जाणार होते. मात्र, या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले. ही चूक लक्षात येताच आयोजकांकडून तात्काळ भारताचे राष्ट्रगीत थांबवण्यात आले व नंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मात्र, या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे सामन्यातील सर्व गोष्टींची जबाबदारी ही पाकिस्तानची आहे. मात्र, अशाप्रकारे अचानक ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारताचे राष्ट्रगीत लागल्यामुळे आता सोशल मीडियावर पाकची खिल्ली उडवली जात आहे. 23 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान या संघांमध्ये महामुकाबला पार पडणार आहे. त्याआधीच ही घटना घडली.

दरम्यान, 23 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान हे संघ एकमेकांना भिडणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भारताने बांगलादेशचा पराभव करत स्पर्धेला सुरुवात केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या