Home / क्रीडा / दहावी नापास क्रिकेटपटू रिंकू सिंह शिक्षणाधिकारी बनला

दहावी नापास क्रिकेटपटू रिंकू सिंह शिक्षणाधिकारी बनला

लखनौ – आयपीएल (IPL) टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळताना केलेल्या शानदार कामगिरीमुळे रातोरात प्रसिध्दीच्या झोतात आलेला उत्तर प्रदेशचा...

By: Team Navakal
cricketer rinku singh

लखनौ – आयपीएल (IPL) टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळताना केलेल्या शानदार कामगिरीमुळे रातोरात प्रसिध्दीच्या झोतात आलेला उत्तर प्रदेशचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह (cricketer rinku singh) एका वेगळ्याच वादात सापडला आहे. रिंकू दहावी नापास आहे. पण उत्तर प्रदेश सरकारने त्याची जिल्हा मुलभूत शिक्षण अधिकारी पदावर(Basic Education Officer)नियुक्ती केली आहे.त्यामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला आहे.

जिल्हा मुलभूत शिक्षण अधिकारी पदासाठी पदव्युत्तर पदवी अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या पदासाठी उमेदवारांची निवड करतो. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिस्तबध्द प्रयत्न करण्याची जबाबदारी जिल्हा मुलभूत शिक्षण अधिकाऱ्यावर असते. नव्या पिढीचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी असलेल्या या पदावर दहावी नापास रिंकूची नियुक्ती (appointed )करताना सरकारने सर्व नियमांना फाटा दिला,अशी टीका होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्य़ा खेळाडुंच्या थेट नियुक्तीसंबंधीच्या धोरणानुसार रिंकूची नियुक्ती करण्यात आली आहे,असे सरकारचे म्हणणे आहे. त्याच्या नियुक्तीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून थेट भरतीसंबंधीच्या नियमात सुधारणा करण्याचा विचार सरकार करत आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या