Home / क्रीडा / Suryakumar yadav:राजकीय वक्तव्य करणे टाळा !सूर्यकुमारला आयसीसीचा सल्ला

Suryakumar yadav:राजकीय वक्तव्य करणे टाळा !सूर्यकुमारला आयसीसीचा सल्ला

Suryakumar yadavभारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने(suryakumar yadav)पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पहलगाम हल्ल्यातील मृतांना आदरांजली अर्पण केली होती. याबाबत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीवरुन...

By: Team Navakal
suryakumar yadav

Suryakumar yadavभारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने(suryakumar yadav)पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पहलगाम हल्ल्यातील मृतांना आदरांजली अर्पण केली होती. याबाबत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीवरुन आयसीसीने आज सुनावणी घेतली. या सुनावणीला सूर्यकुमार यादवने हजेरी लावली. त्यात त्याला आयसीसीने राजकीय वक्तव्य करणे टाळा, असा सल्ला देऊन समज दिली. मात्र सद्धा त्यांच्यावरील मोठी कारवाई टळली आहे.
त्यावेळी सूर्यकुमारसोबत बीसीसीआयचे सीओओ आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर देखील होते. या सुनावणीत सामनाधिकारी रिचर्ड्सन यांनी सूर्यकुमारला राजकीय असे कोणतेही वक्तव्य करू नकोस, असे सांगितले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली असली तरी त्याने लेव्हल १ चे उल्लंघन आहे. परिणामी सूर्यकुमारला फक्त वॉर्निंग किंवा त्याच्या सामना शुल्काच्या १५ टक्के दंड होऊ शकतो. १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर सूर्यकुमारने भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना पाठिंबा दर्शविणाऱ्या टिप्पणी केली होती. यावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती.

२१ सप्टेंबरला दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान किस्तानी क्रिकेटपटू हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनीही चिथावणीखोर हावभाव केले. रौफने आकाशातून विमान पाडण्याचे हातवारे केले होते, तर साहिबजादाने अर्धशतक ठोकल्यानंतर बॅट बंदुकीसारखी धरुन गोळ्या झाडत असल्याचे खूण केली होती. त्यानंतर या दोघांच्या विरोधात बीसीसीआयनेही आयसीसीकडे तक्रार केली होती.


हे देखील वाचा –

नेपाळच्या राजकारणात तरुणांचा सहभाग वाढणार; सरकारने थेट मतदानाचे वयच बदलले

 बोनस २ हजार रूपयांची भाऊबीज ! तटकरेंची माहिती

Web Title:
संबंधित बातम्या