Home / क्रीडा / टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचे नाव ? Dream11 पेक्षाही मोठी ‘इतक्या’ कोटींची स्पॉन्सरशीप डील होण्याची शक्यता

टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचे नाव ? Dream11 पेक्षाही मोठी ‘इतक्या’ कोटींची स्पॉन्सरशीप डील होण्याची शक्यता

BCCI Team India New Sponsor

BCCI Team India New Sponsor: ऑनलाइन गेमिंग बिल (Online Gaming Bill) मंजूर झाल्यानंतर स्पोर्ट्स-टेक कंपनी ड्रीम11 (Dream11) ने भारतीय क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशीप करारातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय नवा स्पॉन्सर शोधत आहे.

मात्र, बीसीसीआयसमोर आशिया कप 2025 (Asia Cup 2025) सुरू होण्याआधी संघासाठी स्पॉन्सर शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआय आधीच्या कराराच्या तुलनेत मोठा स्पॉन्सर करार करण्याची शक्यता आहे. या कराराचा आकडा देखील समोर आला आहे.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय 2025 ते 2028 या कालावधीसाठी एका नव्या स्पॉन्सरच्या शोधात आहे. या कराराचे मूल्य 450 कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. याआधी ड्रीम 11 ने केलेला स्पॉन्सरशीप करार 358 कोटी रुपयांचा होता. मात्र, आता बीसीसीआय त्यापेक्षा अधिक मोठा करार करण्याची शक्यता आहे.

आशिया कपसाठी मोठा पेच

आशिया कप लवकरच सुरू होणार असल्यामुळे, त्याआधी जर्सीवर स्पॉन्सरचे नाव छापले जाईल का, याबाबत अनिश्चितता आहे. मात्र, बीसीसीआयला विश्वास आहे की, 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकापूर्वी (Women’s World Cup) नवीन स्पॉन्सर निश्चित होईल.

ड्रीम11 ने करार रद्द केल्यानंतर, बीसीसीआयने त्वरित नवीन कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. मात्र, वेळेअभावी आशिया कपसाठी नवीन स्पॉन्सर मिळणे थोडे कठीण दिसत आहे. तरीही बीसीसीआयकडून लवकरात लवकर स्पॉन्सर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

1 सप्टेंबरपासून 8 मोठे बदल लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…

राज ठाकरे कुचक्या कानाचे ! मनोज जरांगेंचा हल्लाबोल