Abhishek Sharma New Car : भारतीय युवा क्रिकेटपटू अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) आपल्या कार कलेक्शनमध्ये एका अतिशय शानदार आणि महागड्या गाडीचा समावेश केला आहे. अभिषेकने नुकतीच Ferrari Purosangue ही आलिशान कार खरेदी केली असून, तिची किंमत सुमारे 10.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
अभिषेकने आपल्या इंस्टाग्रामवर नवीन कारचे फोटो शेअर केले, ज्यात तो डेनिम जॅकेट आणि सनग्लासेसमध्ये स्टायलिश दिसत आहे.
Asia Cup मधील यशानंतर मोठी खरेदी
अभिषेक शर्माची ही नवीन कारAsia Cup 2025 मधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर खरेदी केली आहे. त्याने या स्पर्धेत 7 इनिंग्समध्ये सर्वाधिक 314 धावा करण्याची कामगिरी केली होती. त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा खिताब मिळाला होता. त्याला Haval H9 SUV ही पुरस्कार म्हणून मिळाली होती आता त्याने Ferrari Purosangue ही आलिशान एसयूव्ही खरेदी केली आहे.
Ferrari Purosangue चे खास फीचर्स आणि स्पीड
Ferrari Purosangue ही फेरारीची पहिली 4 डोअर एसयूव्ही आहे. अभिषेकने घेतलेल्या कारमध्ये चमकदार काळ्या रंगाचे बाहेरील आणि लाल रंगाचे इंटिरियर (Interior) आहे, जे या कारला बोल्ड आणि स्पोर्टी लुक देते.
- इंजिन आणि पॉवर: यात नैचुरली एस्पिरेटेड V12 इंजिन वापरले आहे. हे इंजिन 725 हॉर्स पॉवर आणि 716 Nm टॉर्क जनरेट करते.
- स्पीड: ही कार केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडते.
- तंत्रज्ञान: यात खास मल्टी मॅजिक ट्रू ॲक्टिव्ह स्पूल व्हॉल्व्ह (TASV) सस्पेंशन तंत्रज्ञान दिले आहे, जे रस्त्याच्या स्थितीनुसार डॅम्पर्स जलद गतीने समायोजित करते. ड्रॅग कमी करण्यासाठी एयरोब्रिज डिझाइनचा वापर केला आहे.
- इंटिरियर आणि सुविधा: या कारमध्ये मागे उघडणारे खास सुसाइड डोअर, इलेक्ट्रोक्रोमिक ग्लास रूफ, मसाज सुविधा असलेली फ्रंट सीट (10 एअरबॅगसह), एअर क्वालिटी सेन्सर , आणि मागील प्रवाशांसाठी वायरलेस चार्जिंग सुविधा मिळते. विशेष म्हणजे, फेरारीमध्ये प्रथमच यात Android Auto आणि Apple CarPlay चा सपोर्ट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – “आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही!” उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांचे मदत देण्याबाबत सूचक विधान