Home / क्रीडा / Rinku singh : क्रिकेटर रिंकू सिंगला तीनदा धमकी ! दाऊद गँगने 5 कोटी खंडणी मागितली

Rinku singh : क्रिकेटर रिंकू सिंगला तीनदा धमकी ! दाऊद गँगने 5 कोटी खंडणी मागितली

Rinku singh-आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेत भारताच्या विजयासाठी हातभार लावलेल्या खेळाडूपैकी असलेला स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग (Rinku singh)अंडरवर्ल्डच्या रडारवर आहे....

By: Team Navakal
Rinku singh

Rinku singh-आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेत भारताच्या विजयासाठी हातभार लावलेल्या खेळाडूपैकी असलेला स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग (Rinku singh)अंडरवर्ल्डच्या रडारवर आहे. त्याच्याकडे दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीने  पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती  मुंबई गुन्हे शाखेने दिली. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद दिलशाद  आणि मोहम्मद नवेद या दोघांना अटककेली होती.


मुंबई गुन्हे शाखेने माहिती दिली की,2025  फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या प्रमोशनल टीमला तीन वेळा खंडणीची मागणी करणारे धमकीचे संदेश प्राप्त झाले. हे संदेश अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून मिळाले होते. या प्रकरणात मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवेद या दोन संशयितांना वेस्ट इंडिजमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून अटक केली. इंटरपोलच्या मदतीने 1 ऑगस्ट 2025 रोजी त्यांना भारतात आणले. त्यानंतर तपासात समजले की, अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वी दिवंगत माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्याकडून  10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. चौकशीदरम्यान आरोपींपैकी एकाने रिंकू सिंगला फोन करून खंडणीची मागणी केल्याची कबुली दिली.


क्रिकेटर रिंकू सिंग याने उत्तर प्रदेशातील अलीगड येथील अत्यंत साध्या कुटुंबातून  येऊन क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवली. तो सध्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज सोबत त्याचा साखरपुडा पार पडला आहे. क्रिकेट खेळावर सतत मॅचफिक्सिंगच्या आरोपांचे सावट असते. त्यातच आता त्यांना
अंडरवर्ल्ड कडून धमकीचे फोन येऊ लागले आहेत.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा –

हिजाबवरून दीपिकाला केलं ट्रॉल; हिजाब परिधानकरून दीपिकाच जाहिरात शूट

ब्रिटनची नऊ नामवंत विद्यापीठे भारतात शाखा सुरू करणार

डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का?

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या