Home / क्रीडा / ‘लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक शोषण केले’, RCB च्या स्टार खेळाडूवर महिलेने केले गंभीर आरोप

‘लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक शोषण केले’, RCB च्या स्टार खेळाडूवर महिलेने केले गंभीर आरोप

Yash Dayal | आयपीएल चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा (RCB) खेळाडू यश दयाळवर (Yash Dayal) एका महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन...

By: Team Navakal
Yash Dayal

Yash Dayal | आयपीएल चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा (RCB) खेळाडू यश दयाळवर (Yash Dayal) एका महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिलेने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑनलाइन पोर्टलवर (IGRS) तक्रार दाखल केली. तसेच, याबाबत सोशल मीडियावर देखील माहिती दिली.

या तक्रारीनंतर गाझियाबादच्या इंदिरानगर पोलिसांना चौकशी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महिलेच्या तक्रारीनुसार, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयाळसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यशने लग्नाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक केली आणि मानसिक, भावनिक तसेच शारीरिक शोषण केले. तक्रारीत म्हटले आहे की, यशने तिला आपल्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि पतीप्रमाणे वागला, ज्यामुळे तिचा विश्वास संपादन केला.

मात्र, फसवणूक उघड झाल्यावर तिला मारहाण आणि त्रास देण्यात आला. यशने तिचे आर्थिक शोषण केल्याचा आणि इतर मुलींसोबतही अशाच खोट्या नात्यांमध्ये गुंतल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेच्या दाव्यानुसार, तिच्याकडे चॅट रेकॉर्ड्स, स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ कॉल आणि फोटोंचे पुरावे आहेत. तिने 14 जून 2025 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, परंतु कारवाई न झाल्याने तिने थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली.

“या प्रकरणात त्वरित आणि निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी तिने केली आहे. यश दयाळ यांनी या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या