Home / क्रीडा / David Miller GT vs DC : आयपीएल २०२६: रोमांचक सामन्यात गुजरातचा दिल्लीवर १ धावेने विजय; डेव्हिड मिलरची ‘ती’ एक चूक दिल्लीला पडली महागात

David Miller GT vs DC : आयपीएल २०२६: रोमांचक सामन्यात गुजरातचा दिल्लीवर १ धावेने विजय; डेव्हिड मिलरची ‘ती’ एक चूक दिल्लीला पडली महागात

David Miller GT vs DC : आयपीएल २०२६ च्या हंगामात काल गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक श्वास रोखून...

By: Team Navakal
David Miller GT vs DC
Social + WhatsApp CTA

David Miller GT vs DC : आयपीएल २०२६ च्या हंगामात काल गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक श्वास रोखून धरणारा सामना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या १ धावेने निसटता विजय मिळवला. विजयासाठी केवळ २ चेंडूंत २ धावांची आवश्यकता असताना डेव्हिड मिलरने धाव घेण्यास नकार दिल्याने दिल्लीच्या हातात आलेला विजय निसटला. या निकालामुळे गुजरातने यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला, तर दिल्लीला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

गुजरातची दमदार फलंदाजी आणि २१० धावांचे आव्हान-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण स्वीकारलेल्या गुजरात टायटन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जोस बटलर (५२ धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (७० धावा) यांनी अर्धशतकी खेळी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. वॉशिंग्टन सुंदरनेही ५५ धावांचे योगदान दिले, ज्यामुळे गुजरातला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. दिल्लीकडून मुकेश कुमारने २ बळी घेतले, तर कुलदीप यादवने जोस बटलरला बाद करत महत्त्वपूर्ण यश मिळवले. शेवटच्या षटकांत ग्लेन फिलिप्सने उपयुक्त १४ धावांची भर घातली.

केएल राहुलची झुंजार खेळी आणि दिल्लीचा पाठलाग-
२११ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली. मात्र, पथुम निसांका ७६ धावांच्या एकूण धावसंख्येवर बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव काहीसा घसरला. नितीश राणा, समीर रिझवी आणि अक्षर पटेल यांसारखे फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. एका बाजूला विकेट्स पडत असताना कर्णधार केएल राहुलने ५२ चेंडूंत ९२ धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले.

शेवटच्या षटकाचा थरार आणि मिलरचा तो निर्णय-
विजयासाठी अखेरच्या २ षटकांत ३६ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजच्या १९ व्या षटकात दिल्लीने २३ धावा वसूल केल्या. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या आणि दिल्लीने जिद्दीने ११ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या २ चेंडूंत केवळ २ धावा हव्या असताना पाचव्या चेंडूवर डेव्हिड मिलरने एकेरी धाव घेण्यास नकार दिला. यामुळे शेवटच्या चेंडूवर २ धावांचे समीकरण उरले. मात्र, अंतिम चेंडूवर मिलरला मोठा फटका मारता आला नाही आणि दुसऱ्या बाजूला धावा घेण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादव धावबाद झाला. परिणामी, दिल्लीला २० षटकांत ८ बाद २०९ धावाच करता आल्या.

सामन्यानंतर डेव्हिड मिलर भावूक-
हातातील सामना गमावल्यानंतर डेव्हिड मिलरला आपले अश्रू आवरता आले नाहीत. स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे संघ पराभूत झाल्याची जाणीव झाल्याने तो मैदानातच भावूक झाला. यावेळी क्रीडासंस्कृतीचे दर्शन घडवत गुजरातचा कर्णधार शुभमन गिल, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि दिल्लीच्या कर्णधारानेही मिलरला धीर दिला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या