Home / क्रीडा / आशिया कपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली; Dream11 ने स्पॉन्सरशिप सोडल्याची चर्चा; खेळाडूंच्या जर्सीवर कोणाचा लोगो दिसणार?

आशिया कपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली; Dream11 ने स्पॉन्सरशिप सोडल्याची चर्चा; खेळाडूंच्या जर्सीवर कोणाचा लोगो दिसणार?

Dream11 Drops Team India Sponsorship

Dream11 Drops Team India Sponsorship: आशिया कप (Asia Cup 2025) सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाच्या जर्सीचा मुख्य प्रायोजक असलेल्या Dream11 कंपनीने हा करार रद्द केल्याची चर्चा सुरू आहे.

संसदेत ‘ऑनलाइन गेमिंग बिल’ (online gaming bill 2025) मंजूर झाल्यानंतर ही घडामोड घडल्याचे म्हटले जात आहे. या कायद्यामुळे ऑनलाइन फॅन्टसी आणि जुगार प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. ऑनलाइन गेमिंग कंपन्या बंद झाल्यामुळे जवळपास 20 हजार जणांना नोकरी गमवावी लागणार आहे. त्यातच आता ड्रीम 11 ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडल्याचे सांगितले जात आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ड्रीम11 ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबतचा (BCCI) करार पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला आहे. मात्र, याबाबत दोन्हीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

बीसीसीआयचे सचिव देबजित सैकिया यांनी सांगितले की, बीसीसीआय देशातील कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेल आणि जर ऑनलाइन गेमिंगला परवानगी नसेल, तर आम्ही त्या नियमांनुसारच पुढे जाऊ.

नवीन स्पॉन्सरशिपची शक्यता

बीसीसीआय आशिया कप सुरू होण्यापूर्वी नवीन जर्सी स्पॉन्सरसाठी निविदा मागवू शकते. जर 9 सप्टेंबर पूर्वी नवीन करार निश्चित झाला नाही, तर भारतीय संघ आएशिया कपमध्ये जर्सीवर कोणताही मुख्य प्रायोजक नसताना खेळू शकतो. रिपोर्टनुसार, ड्रीम11 चा लोगो असलेल्या जर्सी आधीच छापून तयार आहेत, पण त्यांचा वापर होण्याची शक्यता कमी आहे.

ड्रीम11 ने जुलै 2023 मध्ये 358 कोटी रुपयांचा तीन वर्षांचा करार केला होता. याआधी सहारा, स्टार इंडिया, ओप्पो आणि बायजू यांसारख्या कंपन्यांनीही भारतीय संघाला स्पॉन्सर केले होते, पण त्यांनाही विविध कारणांमुळे अडचणी आल्या होत्या.

दरम्यान, आशिया कपला 9 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध होणार आहे.


हे देखील वाचा –

9 कॅरेट सोने नक्की काय आहे? किंमत-शुद्धेपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

PAN Card हरवले? आता फक्त 5 मिनिटांत घरी बसून करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक