IND vs ENG Test Series : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

IND vs ENG

India vs England Test Series | इंग्लंडने भारताविरुद्धच्या (India vs England Test) कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हेडिंग्ले येथे 20 जूनपासून ही मालिका सुरू होणार आहे. कर्णधारपदाची धुरा बेन स्टोक्स याच्या खांद्यावर देण्यात आली असून, तब्बल 3 वर्षांनंतर जेमी ओव्हरटन कसोटी संघात परतला आहे. त्याने याआधी फक्त एकच कसोटी सामना, 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळला होती.

झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटीत हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे गस ॲटकिन्सन उपलब्ध नव्हता. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, ओव्हरटन आणि जॉश टंग यांच्यावर आहे. फिरकीपटूंमध्ये फक्त शोएब बशीर याला संधी देण्यात आली आहे. झेकब बेथेल देखील संघात पुनरागमन करतो आहे.

इंग्लंड संघ:

बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जॉश टंग, ख्रिस वोक्स.

दुसरीकडे, बीसीसीआयने (BCCI) याआधीच इंगलंडच्या कसोटी दौऱ्यासाठी भारताच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) भारताचा नवा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करतो आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कसोटी निवृत्तीमुळे हा दौरा भारतासाठी एक नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.

तसेच, रवीचंद्रन अश्विन याच्या निवृत्तीनंतर भारताची ही पहिली कसोटी मालिका आहे. 8 वर्षांनंतर करुण नायर संघात परतला असून, त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध द्विशतक झळकावले आहे. अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जयस्वाल, नितीश रेड्डी यांनीही दमदार फॉर्म दाखवला आहे.

भारताचा कसोटी संघ:

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.