इंग्लंडमध्ये गौतम गंभीरचे जोरदार भांडण, मैदानावरच ओव्हलच्या पिच क्यूरेटरसोबत वाद; नक्की काय झाले? वाचा

Gautam Gambhir and Oval Pitch curator's argument

Gautam Gambhir and Oval Pitch curator’s argument: भारत आणि इंग्लंड (Ind vs ENg Test Series) यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात हँडशेकवरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता 5व्या कसोटी सामना सुरू होण्याआधीच वादाला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि ओव्हल पिच क्यूरेट (Oval Pitch curator) फोर्टिस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

दोघांमध्ये वाद नक्की कशामुळे झाला हे अस्पष्ट असले तरीही बाचाबाची करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Gautam Gambhir and Oval Pitch curator’s argument)

गंभीर आणि फोर्टिस यांच्यातील वादाचे कारण सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टीची स्थिती किंवा तिचा वापर असावा, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. फोर्टिस यांनी गंभीरकडे येऊन “मला याची तक्रार करावी लागेल,” असे म्हटल्यावर गंभीरने त्यांना थेट प्रत्युत्तर दिले, “तुम्ही जा आणि तुम्हाला हवी ती तक्रार करा.” त्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला.

गंभीरने स्पष्ट शब्दांत सांगितले, “तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगू शकत नाही, तुम्ही फक्त मैदानातील कर्मचारी आहात.” याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कोटक यांची शांतता राखण्याची भूमिका

वाद वाढत असताना फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोर्टिस यांना आश्वासन दिले की भारतीय संघ कुठलेही नुकसान करणार नाही. या घटनेबाबत फोर्टिस यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले.

प्रसंगानंतर कोटक यांनी स्पष्ट केले की फोर्टिस काही गोष्टींविषयी अतिशय संरक्षक होते. त्यांनी भारतीय सपोर्ट स्टाफशी ज्या पद्धतीने वागणूक दिली ती गंभीरला आवडली नाही. त्यांनी संघाला खेळपट्टीपासून दोन ते अडीच मीटर अंतरावर राहण्यास सांगितले होते. कोटक म्हणाले, “क्यूरेटरला हे समजून घेतले पाहिजे की प्रशिक्षक हे तज्ज्ञ आणि अनुभवी लोक असतात. खेळपट्टी ही काही ऐतिहासिक वस्तू नाही की स्पर्श केल्याने तुटेल.”

कसोटीपूर्वी तणाव, उत्सुकता वाढली

पाचवी आणि अंतिम कसोटी गुरुवारपासून ओव्हलवर सुरू होणार आहे. सध्या इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी आहे. मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत भारताने चांगला लढा दिल्यानंतर ही मालिका निर्णायक वळणावर आली आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या वादामुळे वातावरण अधिकच तापले असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे देखील वाचा –

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या घटनेची पुनरावृत्ती टळली! विमान हवेत असतानाच पायलटने दिला ‘मेडे’ कॉल; नक्की काय घडले?

अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांना योगेश कदमांविरोधात पुरावे दिले

महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपाचे वर्चस्व; दरेकरांकडे एकहाती सत्ता