Home / क्रीडा / Quinton de Kock :डी कॉकने एकदिवसीय क्रिकेटमधून दोन वर्षांनी निवृत्ती मागे घेतली

Quinton de Kock :डी कॉकने एकदिवसीय क्रिकेटमधून दोन वर्षांनी निवृत्ती मागे घेतली

Quinton de Kock :दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉकने( Quinton de Kock )निवृत्तीनंतर पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. ३२...

By: Team Navakal
Quinton de Kock

Quinton de Kock :दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉकने( Quinton de Kock )निवृत्तीनंतर पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. ३२ वर्षीय डी कॉकने २०२३ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तो ३० वर्षांचा होता, तेव्हा या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. २०२१ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ( south africa cricket board) पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकांसाठी संघ जाहीर केले. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात डी कॉकचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, कसोटी कर्णधार टेम्बा वाबुमाला दुखापतीमुळे कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी एडेन मार्करम कर्णधारपद भूषवेल. डी कॉकने १५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६७७० धावा केल्या. डी कॉकने आतापर्यंत १५५ एकदिवसीय सामने खेळले, ९६.६४ च्या स्ट्राईक रेटने ६७७० धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने २१ शतके आणि ३० अर्धशतके केली आहेत. २०२३ च्या विश्वचषकात त्याने १० डावांमध्ये १०७ च्या स्ट्राईक रेटने ५९४ धावा केल्या, ज्यात चार शतके समाविष्ट आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर राहिला.


हे देखील वाचा 

दिल्लीचे रणजी खेळाडू मिथुन मन्हास बीसीसीआयचे अध्यक्ष होणार?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या