Home / क्रीडा / ऋषभ पंतची ‘टॉप-10’ मध्ये एंट्री, ICC कसोटी क्रमवारीत मोठी झेप; बुमराह गोलंदाजीत अव्वल

ऋषभ पंतची ‘टॉप-10’ मध्ये एंट्री, ICC कसोटी क्रमवारीत मोठी झेप; बुमराह गोलंदाजीत अव्वल

ICC Test Rankings | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत (ICC Test...

By: Team Navakal
ICC Test Rankings

ICC Test Rankings | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत (ICC Test Rankings) थेट सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात त्याने दोन्ही डावांत धडाकेबाज शतके (134 आणि 118) ठोकली, ज्यामुळे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी स्थान मिळवले.

पंतने या कामगिरीसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांमध्ये महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले आहे.

पंतचा ऐतिहासिक विक्रम

लीड्स कसोटीत दोन शतके झळकावणारा पंत हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी हा दुर्मिळ विक्रम फक्त झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर याने केला होता. विशेष म्हणजे, एकाच कसोटीत दोन शतके करणारा पंत हा इंग्लंडमध्ये हा पराक्रम करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु हा सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. तरीही, पंतच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.

या कसोटीत भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलने पहिल्या डावात 147 धावांचे शानदार शतक ठोकले. यामुळे तो फलंदाजांच्या क्रमवारीत 20व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, कसोटी क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर कायम आहे आणि तो सध्या भारताचा सर्वोच्च रँकिंगचा फलंदाज आहे. त्याच्यापुढे केवळ जो रूट, हॅरी ब्रूक आणि केन विल्यमसन आहेत.

बुमराह गोलंदाजीत अव्वल

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हेडिंग्ले कसोटीत पुन्हा एकदा पाच बळी घेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याने या सामन्यातील शानदार गोलंदाजीने भारतीय संघाला सामन्यात बराच काळ वरचढ ठेवले होते.

इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा बेन डकेट याने 62 आणि 149 धावांच्या खेळींसह ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला होता. यामुळे त्याने क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत आठवे स्थान मिळवले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने फलंदाजी आणि गोलंदाजीतील चांगल्या कामगिरीमुळे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तीन स्थानांची झेप घेत पाचवे स्थान पटकावले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या