Home / क्रीडा / Women World Cup 2025 : मोदींकडून खास सन्मान! वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला टीमने पंतप्रधानांची घेतली भेट

Women World Cup 2025 : मोदींकडून खास सन्मान! वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला टीमने पंतप्रधानांची घेतली भेट

Women World Cup 2025 : भारतासाठी इतिहास रचणाऱ्या ICC महिला वनडे वर्ल्ड कप 2025 विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा पंतप्रधान नरेंद्र...

By: Team Navakal
Women World Cup 2025
Social + WhatsApp CTA

Women World Cup 2025 : भारतासाठी इतिहास रचणाऱ्या ICC महिला वनडे वर्ल्ड कप 2025 विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी खास सन्मान केला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने नुकताच नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून भारतासाठी पहिलीवहिली महिला आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकण्याचा पराक्रम केला.

विश्वचषक जिंकल्यानंतर दिल्लीत दाखल झालेला भारतीय महिला संघ पंतप्रधान निवासस्थान, 7 लोक कल्याण मार्ग येथे पोहोचला. यावेळी सर्व खेळाडू त्यांच्या अधिकृत औपचारिक गणवेशातहोत्या.

पंतप्रधानांना ‘स्पेशल गिफ्ट’

या भेटीदरम्यान भारतीय संघाने पंतप्रधानांना एक विशेष भेट दिली. सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली जर्सी टीमने त्यांना भेट म्हणून दिली. पंतप्रधानांनी टीमला विजयाबद्दल अभिनंदन केले आणि सोशल मीडियावर तीव्र टीका व सलग तीन पराभवांचा सामना केल्यानंतरही संघाने वर्ल्ड कपमध्ये केलेल्या शानदार पुनरागमनाची प्रशंसा केली.

मोदी आणि खेळाडूंमधील अविस्मरणीय संवाद

र्णधार हरमनप्रीतने 2017 मधील भेटीची आठवण करून दिली, जेव्हा ती ट्रॉफीशिवाय पंतप्रधानांना भेटली होती. हरमनप्रीतने यावेळी मोदींना विचारले की, ते नेहमी ‘वर्तमानात’ कसे राहतात. यावर पंतप्रधानांनी ‘ते आता त्यांच्या जीवनाचा आणि सवयीचा भाग झाले आहे’, असे उत्तर दिले.

दीप्ती शर्मा, जिने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या आणि 215 धावा केल्या, तिला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार मिळाला होता. दीप्ती शर्माने यावेळी सांगितले की, जय श्री राम लिहिणे आणि हातावर हनुमानजींचा टॅटू असणे तिला शक्ती देतो.

फिट इंडियाचा संदेश

यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंना ‘फिट इंडिया’ चा संदेश देशातील मुलींपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. त्यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या (Obesity) समस्येवर चर्चा केली आणि फिट राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उपकर्णधार स्मृती मंधानाने सांगितले की, पंतप्रधानांनी नेहमीच त्यांना प्रेरित केले आहे. तसेच, क्रांती गौड यांच्या भावाला पंतप्रधानांनी त्यांच्या घरी येण्याचे थेट निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी खेळाडूंना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन युवा पिढीला प्रेरित करण्याची विनंती केली.


हे देखील वाचा – 

नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले

Web Title:
संबंधित बातम्या