Home / क्रीडा / IND vs ENG Test: भारत-इंग्लंडमधील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

IND vs ENG Test: भारत-इंग्लंडमधील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

IND vs ENG Test | इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. लीड्स कसोटीत 371 धावांच्या लक्ष्याचा...

By: Team Navakal
IND vs ENG Test

IND vs ENG Test | इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. लीड्स कसोटीत 371 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत इंग्लंडने पहिल्या सामन्यात विजय मिळवला असला, तरी भारतीय क्रिकेट संघ आता पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

दुसरा कसोटी सामना 2 जुलै 2025 पासून बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने संघाची देखील घोषणा केली आहे.

एजबेस्टनची खेळपट्टी ऐतिहासिकदृष्ट्या फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे.मात्र, मागील पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. 2022 मध्ये भारताला याच मैदानावर 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. लीड्स कसोटीत चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी सपाट झाल्याने फलंदाजांना फायदा झाला होता. एजबेस्टनवरही असेच काहीसे चित्र पाहायला मिळू शकते, ज्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.

भारतीय संघात बदलाची शक्यता

लीड्स कसोटीतील शार्दुल ठाकूरच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याच्या जागी युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीला संधी मिळू शकते. जर भारतीय संघाला अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची गरज भासली, तर डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे.

जोफ्रा आर्चरची इंग्लंड संघात पुनरागमन

इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) दुसऱ्या कसोटीसाठी आर्चरचा संघात समावेश केला आहे. त्याच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडचा आक्रमक ‘बॅझबॉल’ दृष्टिकोन आणखी बळकट होऊ शकतो.

इंग्लंडचा संपूर्ण संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जॅकोब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

सामना कधी आणि कुठे पाहाल?

  • सामन्याची वेळ: 2 ते 6 जुलै 2025, दुपारी 3:30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
  • टॉसची वेळ: दुपारी 3:00 वाजता (IST)
  • थेट प्रक्षेपण: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
  • लाइव्ह स्ट्रीमिंग: JioHotstar ॲप आणि वेबसाइट
Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या