Home / क्रीडा / IND vs ENG 4th Test: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळणार का? कोचने दिली महत्त्वाची माहिती

IND vs ENG 4th Test: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळणार का? कोचने दिली महत्त्वाची माहिती

IND vs ENG 4th Test | भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 4th Test) यांच्यामधील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून...

By: Team Navakal
IND vs ENG 4th Test

IND vs ENG 4th Test | भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 4th Test) यांच्यामधील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून खेळला जाणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळणार की नाही? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी स्पष्ट केलं की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरणार आहे. सध्या मालिकेत भारत 1-2 नं पिछाडीवर असून, मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर होणारा हा सामना भारतासाठी करो वा मरो ठरणार आहे.

मालिकेच्या सुरुवातीलाच स्पष्ट झाले होते की बुमराह संपूर्ण मालिका खेळणार नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील तो संघाचा भाग नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी पाच-पाच बळी घेऊन भारताला 336 धावांनी विजय मिळवून दिला होता, पण लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत 22 धावांनी पराभव झाल्याने आता बुमराहने चौथा कसोटी सामना खेळावा, अशी मागणी केली जात आहे.

रयान टेन डोशेट यांनी चौथ्या कसोटीच्या सराव सत्रानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मँचेस्टरमधील हा सामना महत्त्वाचा आहे. बुमराहला शेवटच्या दोन कसोटींपैकी एकासाठी खेळवायचं ठरलं होतं, आणि आता त्याची तयारी पूर्ण आहे.” त्यामुळे बुमराह चौथा कसोटी सामना करणार हे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा –

विधानभवनात राडा! जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांत हाणामारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातात पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राच्या दाव्यावर AAIB ने दिले उत्तर

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या