IND vs SA T20I : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर, भारत आता टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतही आपला विजयी क्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज (9 डिसेंबर 2025) कटक येथील बारबती स्टेडियमवर खेळला जाईल.
पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करेल. शुभमन गिल दुखापतीमुळे कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमधून बाहेर होता, पण आता तो संघात परतण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्करम करेल. या संघात डेव्हिड मिलर आणि रीझा हेंड्रिक्स यांसारख्या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (टी20 ) हेड-टू-हेड
- एकूण सामने: 31
- भारताने जिंकले: 18
- दक्षिण आफ्रिकेने जिंकले: 12
- निकाल नाही: 1
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: पहिल्या टी20 साठी संभाव्य 11 खेळाडू
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, हर्षित राणा/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका: एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक /डोनोव्हान फरेरा (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, डेवाल्ड ब्रेव्हिस, कोर्बिन बॉश, मार्को जानसेन, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, केशव महाराज.
सामना थेट पाहण्यासाठी माहिती
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 सामना JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर थेट पाहता येईल. Star Sports नेटवर्कवर वर देखील सामन्याचा आनंद घेऊ शकता.
IND vs SA T20I : टी20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
| सामना | तारीख | दिवस | वेळ | ठिकाण |
| पहिला टी20 | 09-Dec-25 | मंगळवार | 7:00 | कटक |
| दुसरा टी20 | 11-Dec-25 | गुरुवार | 7:00 | नवी चंदीगड |
| तिसरा टी20 | 14-Dec-25 | रविवार | 7:00 | धर्मशाळा |
| चौथा टी20 | 17-Dec-25 | बुधवार | 7:00 | लखनऊ |
| पाचवा टी20 | 19-Dec-25 | शुक्रवार | 7:00 | अहमदाबाद |









