Home / क्रीडा / Asia Cup 2025 Final: पाकिस्तानला हरवूनही टीम इंडियाने ट्रॉफी का नाकारली? जाणून घ्या नेमकं कारण

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानला हरवूनही टीम इंडियाने ट्रॉफी का नाकारली? जाणून घ्या नेमकं कारण

India vs Pakistan Asia Cup 2025 Final : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर काल (28 सप्टेंबर) झालेल्या आशिया चषक (Asia Cup) अंतिम...

By: Team Navakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Final

India vs Pakistan Asia Cup 2025 Final : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर काल (28 सप्टेंबर) झालेल्या आशिया चषक (Asia Cup) अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट राखून थरारक पराभव करत विजय मिळवला आहे.

41 वर्षांच्या आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल झाली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात 147 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली आणि सुरुवातीचे तीन महत्त्वाचे गडी लवकर बाद झाले.

मात्र, त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. मात्र, सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यात मोठ्या घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाने विजेतेपदाची ट्रॉफी आणि पदके स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला.

याआधीही भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नव्हते. आता अंतिम सामन्यात विजयानंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते ट्रॉफी स्विकारण्यास भारतीय संघाने नकार दिला. मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्रीही असल्याने भारताने हा निर्णय घेतला.

ट्रॉफी स्वीकारण्यास नकाराचे कारण

BCCI सचिव देबाजी सायकिया यांनी भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्विकारण्यास का नका दिला याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “जी व्यक्ती आमच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेल्या देशाचे प्रतिनिधित्व करते, तिच्याकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे आम्ही ती ट्रॉफी घेण्यास नकार दिला आहे.”

यासोबतच त्यांनी ट्रॉफी सुरक्षितपणे भारतात पाठवण्याची मागणी केली. ते पुढे म्हणाले, “याचा अर्थ असा नाही की, त्या व्यक्तीने आमच्या देशाला द्यायची असलेली ट्रॉफी आणि पदके स्वतःच्या हॉटेलमध्ये घेऊन जावीत. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे आणि आम्ही आशा करतो की ते त्यांची सद्सद् विवेकबुद्धी वापरून ट्रॉफी लवकरात लवकर भारताकडे पाठवतील, ज्यामुळे किमान थोडी नैतिकता जपली जाईल. आम्ही त्यांच्याकडून ही अपेक्षा करत आहोत.”

या संपूर्ण घटनेबद्दल BCCI कडे तीव्र निषेध नोंदवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

काल्पनिक ट्रॉफीसह सेलिब्रेशन आणि BCCI चा मोठा पुरस्कार

दरम्यान, ट्रॉफी आणि पदके नाकारल्यानंतरही टीम इंडियाचा उत्साह कमी झाला नाही. खेळाडूंनी कॅमेऱ्यासमोर काल्पनिक ट्रॉफी (Imaginary Trophy) हातात घेऊन आनंदाने पोझ दिल्या. सूर्यकुमार यादवने विशेषतः रोहित शर्माच्या शैलीत ‘स्लो वॉक’ करत काल्पनिक ट्रॉफी धरल्याचा अभिनय केला.

या विजयाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी 21 कोटी रुपये रोख बक्षीस (Cash Award) जाहीर केले.

हे देखील वाचा – 

चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आलेला शाह बानो खटला नेमका काय आहे? जाणून घ्या

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या