India vs Pakistan Toss Controversy: श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक 2025 (ICC Women’s World Cup 2025) स्पर्धेतील सामन्यात भारतीय महिला संघाने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 88 धावांनी दणदणीत पराभव केला.
भारताने दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 43 षटकांत केवळ 159 धावांतच सर्वबाद झाला. या शानदार विजयामुळे भारतीय महिला संघाने विश्वचषकातील आपली मोहीम अधिक मजबूत केली आहे. मात्र, या सामन्यापूर्वी झालेल्या टॉसमध्ये एक मोठा गोंधळ झाला, ज्यामुळे मॅच रेफरीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
It's time for some batting firepower 💥
— Star Sports (@StarSportsIndia) October 5, 2025
Pakistan win the toss and #TeamIndia will bat first! 🏏
Catch the LIVE action ➡ https://t.co/CdmEhf3jle#CWC25 👉 #INDvPAK | LIVE NOW on Star Sports network & JioHotstar! pic.twitter.com/bqYyKrwFLt
मॅच रेफरीकडून मोठी चूक, टॉसचा व्हिडिओ व्हायरल
सामन्यादरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना टॉससाठी मैदानात आल्या होत्या.टॉसदरम्यान फातिमा सनाने ‘टेल्स’ असे म्हटले, पण नाणे ‘हेड्स’ पडले. तरीही, मॅच रेफरी शेंद्रे फ्रिट्झ यांनी फातिमाचा कॉल चुकून बरोबर ठरवला आणि तिला टॉस जिंकल्याबद्दल निर्णय घेण्याचा हक्क मिळाला.
या गोंधळामुळे फातिमाने प्रथम गोलंदाजीकरण्याचा निर्णय घेतला. टॉसचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठा व्हायरल होत असून, मॅच रेफरीच्या या चुकीच्या निर्णयावर चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ टीका करत आहेत.
हरमनप्रीत कौरची ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम
टॉसच्या वेळी भारत-पाकिस्तान (India-Pakistan Match) सामन्यांतील वाढलेला तणाव पुन्हा एकदा दिसून आला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाची ‘नो-हँडशेक’ पॉलिसी कायम ठेवली. हरमनप्रीत आणि फातिमा टॉससाठी वेगवेगळ्या मार्गाने आल्या आणि त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा हस्तांदोलनही केले नाही. याच वर्षी भारतीय पुरुषांच्या संघाने आशिया चषकातही असेच केले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
भारताच्या फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रदर्शन
दरम्यान, सामन्यात पावसाच्या अल्प व्यत्ययानंतर भारताने 50 षटकांत 247 धावांची मजल मारली. भारताकडून हरलीन देओलने (Harleen Deol) 46 धावांची सर्वाधिक खेळी केली, तर अखेरच्या टप्प्यात रिचा घोषने नाबाद 35 धावा ठोकून धावसंख्या वाढविण्यात मदत केली. पाकिस्तानकडून डायना बेगने 4 बळी घेत भारतीय फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ दबावाखाली कोसळला आणि सिद्रा अमीनने एकट्याने 81 धावांची झुंजार खेळी केली, पण तिला इतर फलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकून स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला.
हे देखील वाचा – रोहित-विराट मैदानात कधी खेळताना दिसणार? जाणून घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजचे वेळापत्रक