Mohammed Siraj Record : लंडनमधील ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर (India vs England Test Match) थरारक विजय मिळवला. या विजयासह, टीम इंडियाने 2-2 अशा बरोबरीत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी राखण्यात यश मिळवले.
शेवटच्या दिवशी मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj Record)हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडला 6 धावांनी हरवले. पाच कसोटी सामन्यांची मालिका परदेशात खेळताना, शेवटचा सामना जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
यासोबतच, सिराजने एक नवीन विक्रम देखील केला आहे. सोबतच, सिराजने एक नवीन विक्रम देखील केला आहे. तो आता इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
An unforgettable Day for India🇮🇳 and Mohammed Siraj ❤️🔥
— Abhi (@extraa2AB) August 4, 2025
In the heart of conflict, Siraj’s courage shines, transforming the tides of war into a saga of victory.#Siraj #INDvsENG #OvalTest
pic.twitter.com/shwHZgdtah
सिराज ठरला ‘विजयाचा हिरो’
इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी फक्त 35 धावांची गरज होती, तर भारताला 4 विकेट्स घ्यायच्या होत्या. भारतीय संघ या स्थितीतून सामना जिंकेल, असा अनेकांना विश्वास नव्हता. पण, मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने चमत्कार घडवला. त्याने शेवटच्या चारपैकी तीन विकेट्स घेऊन भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
सिराजने या मालिकेत एकूण 23 विकेट्स घेतल्या असून, तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 5 सामन्यांच्या 9 डावांमध्ये 185.3 षटके गोलंदाजी केली. यात 26 मेडन ओव्हर्सचा समावेश आहे.
𝘽. 𝙀. 𝙇. 𝙄. 𝙀. 𝙑. 𝙀 pic.twitter.com/ClrCat7IMJ
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) August 4, 2025
सिराजने या मालिकेत दोन वेळा एका डावात 5 विकेट्स, तर एका सामन्यात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याची सर्वोत्तम कामगिरी 70 धावा देऊन 6 विकेट्सची राहिली.
सिराजच्या तुलनेत भारतीय संघातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) होता, त्याने 3 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या.
सिराजचा नवा विक्रम
या 23 विकेट्ससह मोहम्मद सिराजने एक मोठा विक्रमही केला आहे. इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने आता बुमराहसह संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले आहे. 2021-2022 मध्ये बुमराहने 23 विकेट्स घेतल्या होत्या, तर या यादीत तिसऱ्या स्थानावर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आहे, ज्याने 2014 मध्ये 19 विकेट्स मिळवल्या होत्या.