IND vs SA T20 Series : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका 2-1 ने जिंकून टेस्ट सामन्यांच्या पराभवाचा बदला घेतला आहे. टेस्ट मालिकेत भारताला 2-0 ने पराभूत व्हावे लागले होते, मात्र3 सामन्यांची वनडे मालिका जिंकून भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे. या विजयामुळे भारतीय संघाने आपल्या मायदेशात खेळलेल्या मागील 11 वनडे मालिकांपैकी 10 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या लांबच्या दौऱ्यात आता T20 मालिकेची वेळ आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका होणार आहे. या T20 मालिकेकडे T20 विश्वचषक 2026 च्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही संघ ही मालिका आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करतील.
9 डिसेंबरपासून मालिकेला सुरुवात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेची सुरुवात 9 डिसेंबरपासून होणार असून, ती 19 डिसेंबरपर्यंत चालेल. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. नुकताच या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती.
भारत-दक्षिण आफ्रिका T20 मालिकेचे वेळापत्रक
| सामना | दिनांक | ठिकाण |
| पहिला T20 | 9 डिसेंबर | कटक |
| दुसरा T20 | 11 डिसेंबर | चंदीगड |
| तिसरा T20 | 14 डिसेंबर | धर्मशाला |
| चौथा T20 | 17 डिसेंबर | लखनऊ |
| पाचवा T20 | 19 डिसेंबर | अहमदाबाद |
T20 सामने किती वाजता सुरू होतील?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेतील सामने संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी होईल. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण तुम्ही जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) सोबतच स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) पाहू शकता.
T20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.









