India vs WI Test Series : आशिया कप 2025 जिंकल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडीज ( विरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांनी मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे दहा वर्षांनी पहिल्यांदाच भारत त्यांच्याशिवाय मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे.
युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याच्याकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) सायकलमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी भारतासाठी अत्यंत निर्णायक आहे.
IND vs WI कसोटी मालिकेचे वेळापत्रक आणि थेट प्रक्षेपण
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2 ऑक्टोबर, गुरुवार पासून सुरू होत आहे.
- पहिली कसोटी (1st Test): 2 ते 6 ऑक्टोबर या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाईल.
- दुसरी कसोटी (2nd Test): 10 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
दोन्ही कसोटी सामन्यांना सकाळी 9:30 वाजता सुरुवात होईल. या संपूर्ण मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network) उपलब्ध असेल, तर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
दोन्ही संघांचे पूर्ण स्क्वॉड
भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), एन. जगदीसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी.
वेस्ट इंडीज : रॉस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन, केव्हलॉन अँडरसन, ॲलिक अथनाझे, जॉन कॅम्पबेल, टेगेनारिन चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्ह्स, शाई होप, तेविन इम्लाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खारी पिएरे, जेडन सील्स.
हे देखील वाचा – कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून केलं घोषित