IPL प्लेऑफचे चित्र स्पष्ट, कधी व कोणत्या संघात होणार सामने? जाणून घ्या

IPl 2025 playoffs

IPL 2025 playoffs | इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL) 2025 च्या हंगामातील प्लेऑफसाठी (playoffs) चार संघ प्राथमिक फेरी संपण्यापूर्वीच निश्चित झाले होते, तरी अंतिम लीग सामन्याबद्दल उत्सुकता कायम होती. यंदाच्या हंगामातील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB)लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) विजय मिळवत टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केले आहे.

लखनऊविरूद्धच्या विजयासह आरसीबी 19 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावर असलेल्या पंजाब किंग्जचेही (Punjab Kings) तितकेच गुण होते, परंतु नेट रन रेटच्या (net run rate) आधारावर दोन्ही संघांमध्ये फरक होता. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) 18 गुणांसह तिसऱ्या स्थानावर, तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

IPL 2025 प्लेऑफचे वेळापत्रक निश्चित!

लखनऊविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, आरसीबीचा सामना क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जशी होणार आहे. हा सामना 29 मे रोजी चंदीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. याच मैदानावर दुसऱ्या दिवशी एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होईल.

क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरक्वालिफायर 2 मध्ये एकमेकांसमोर असतील. याच मैदानावर 3 जून रोजी अंतिम सामना (Final) खेळला जाईल.

IPL 2025 प्लेऑफचे वेळापत्रक:

  • क्वालिफायर 1: पंजाब किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु – 29 मे, चंदीगड
  • एलिमिनेटर: गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स – 30 मे, चंदीगड
  • क्वालिफायर 2: क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटरमधील विजेता – 1 जून, अहमदाबाद
  • अंतिम सामना: क्वालिफायर 1 मधील विजेता वि. क्वालिफायर 2 मधील विजेता – 3 जून, अहमदाबाद