IPL New Schedule 2025 | आयपीएल 2025 पुन्हा सुरू! कोणत्या संघात रंगणार पहिला सामना? जाणून नवे वेळापत्रक

IPL New Schedule 2025

IPL New Schedule 2025 | भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी याबाबत घोषणा केली. लीग शनिवार, 17 मे पासून पुन्हा सुरू होईल. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

या लीगमध्ये एकूण 17 सामने खेळले जातील आणि हे सामने 6 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जातील. अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल, मात्र प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, सुधारित वेळापत्रकात 2 डबल-हेडर असतील, जे रविवारी खेळले जातील.

बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, “सरकार आणि सुरक्षा एजन्सी तसेच सर्व प्रमुख भागधारकांशी विस्तृत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.”

आयपीएल 2025 चे नवीन वेळापत्रक:

  • 17 मे (शनिवार), संध्याकाळी 7:30 वा: आरसीबी वि. केकेआर, बंगळुरु
  • 18 मे (रविवार), दुपारी 3:30 वा: आरआर वि. पीबीकेएस, जयपूर
  • 18 मे (रविवार), संध्याकाळी 7:30 वा: डीसी वि. जीटी, दिल्ली
  • 19 मे (सोमवार), संध्याकाळी 7:30 वा: एलएसजी वि. एसआरएच, लखनौ
  • 20 मे (मंगळवार), संध्याकाळी 7:30 वा: सीएसके वि. आरआर, दिल्ली
  • 21 मे (बुधवार), संध्याकाळी 7:30 वा: एमआय वि. डीसी, मुंबई
  • 22 मे (गुरुवार), संध्याकाळी 7:30 वा: जीटी वि. एलएसजी, अहमदाबाद
  • 23 मे (शुक्रवार), संध्याकाळी 7:30 वा: आरसीबी वि. एसआरएच, बंगळुरु
  • 24 मे (शनिवार), संध्याकाळी 7:30 वा: पीबीकेएस वि. डीसी, जयपूर
  • 25 मे (रविवार), दुपारी 3:30 वा: जीटी वि. सीएसके, अहमदाबाद
  • 25 मे (रविवार), संध्याकाळी 7:30 वा: एसआरएच वि. केकेआर, दिल्ली
  • 26 मे (सोमवार), संध्याकाळी 7:30 वा: पीबीकेएस वि. एमआय, जयपूर
  • 27 मे (मंगळवार), संध्याकाळी 7:30 वा: एलएसजी वि. आरसीबी, लखनौ

प्लेऑफचे वेळापत्रक:

  • क्वालिफायर 1 – 29 मे
  • एलिमिनेटर – 30 मे
  • क्वालिफायर 2 – 1 जून
  • अंतिम सामना – 3 जून

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील सीमावर्ती तणावामुळे,बीसीसीआयने लीग अचानकएका आठवड्यासाठी स्थगित केली होती. मात्र, दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारल्यामुळे, आयपीएल पूर्ण उत्साहात पुन्हा सुरू होण्यासाठी सज्ज आहे. पण मोठे परदेशी खेळाडू, विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पुन्हा संघात परतणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दोन्ही संघ 11 जून पासून लॉर्ड्स, लंडन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार आहेत.