IPL 2026 Auction : सौदी अरेबियात पार पडलेल्या आयपीएल 2026 च्या लिलावाने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळाली. अ
खेर कोलकाता नाईट रायडर्सने 25.20 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात सामील केले. यासह ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अष्टपैलू आणि परदेशी खेळाडू ठरला आहे.
या लिलावात सर्वात मोठे आश्चर्य ठरले ते म्हणजे अनकॅप्ड भारतीय खेळाडू. उत्तर प्रदेशचा प्रशांत वीर आणि राजस्थानचा यष्टीरक्षक कार्तिक शर्मा या दोघांवर चेन्नई सुपर किंग्सने प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांची बोली लावून सर्वांना थक्क केले. या दोघांची मूळ किंमत केवळ 30 लाख रुपये होती, मात्र त्यांच्यासाठी चेन्नईने आपली तिजोरी खुली केली. तसेच श्रीलंकेचा मथीशा पाथिराना 18 कोटींसह पुन्हा एकदा कोलकात्याच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
आयपीएल 2026: विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
फलंदाज (Batters)
- कॅमेरून ग्रीन – 25.20 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- पाथुम निसांका – 4 कोटी – दिल्ली कॅपिटल्स
- अक्षत रघुवंशी – 2.2 कोटी – लखनऊ सुपर जायंट्स
- राहुल त्रिपाठी – 75 लाख – कोलकाता नाईट रायडर्स
- सरफराज खान – 75 लाख – चेन्नई सुपर किंग्स
- पृथ्वी शॉ – 75 लाख – दिल्ली कॅपिटल्स
- डेव्हिड मिलर – 2 कोटी – दिल्ली कॅपिटल्स
- दानिश मालेवार – 30 लाख – मुंबई इंडियन्स
- अमन राव – 30 लाख – राजस्थान रॉयल्स
- साहिल पारख – 30 लाख – दिल्ली कॅपिटल्स
- विहान मल्होत्रा – 30 लाख – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
गोलंदाज (Bowlers)
- मथीशा पाथिराना – 18 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- मुस्तफिजुर रहमान – 9.2 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- रवी बिश्नोई – 7.2 कोटी – राजस्थान रॉयल्स
- राहुल चहर – 5.2 कोटी – चेन्नई सुपर किंग्स
- ॲडम मिल्ने – 2.4 कोटी – राजस्थान रॉयल्स
- नमन तिवारी – 1 कोटी – लखनऊ सुपर जायंट्स
- अशोक शर्मा – 90 लाख – गुजरात टायटन्स
- सुशांत मिश्रा – 90 लाख – राजस्थान रॉयल्स
- जेकब डफी – 2 कोटी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- अॅनरिक नॉर्ट्जे – 2 कोटी – लखनऊ सुपर जायंट्स
- अकिल होसेन – 2 कोटी – चेन्नई सुपर किंग्स
- आकाश दीप – 1 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- मॅट हेन्री – 2 कोटी – चेन्नई सुपर किंग्स
- लुंगी एन्गिडी – 2 कोटी – दिल्ली कॅपिटल्स
- शिवम मावी – 75 लाख – सनरायझर्स हैदराबाद
- कुलदीप सेन – 75 लाख – राजस्थान रॉयल्स
- ल्यूक वूड – 75 लाख – गुजरात टायटन्स
- कार्तिक त्यागी – 30 लाख – कोलकाता नाईट रायडर्स
- प्रशांत सोळंकी – 30 लाख – कोलकाता नाईट रायडर्स
अष्टपैलू (All-rounders)
- प्रशांत वीर – 14.20 कोटी – चेन्नई सुपर किंग्स
- लियाम लिविंगस्टोन – 13 कोटी – सनरायझर्स हैदराबाद
- ऑकिब दार – 8.4 कोटी – दिल्ली कॅपिटल्स
- व्यंकटेश अय्यर – 7 कोटी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- जेसन होल्डर – 7 कोटी – गुजरात टायटन्स
- मंगेश यादव – 5.20 कोटी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- बेन ड्वार्शिस – 4.4 कोटी – पंजाब किंग्स
- जॅक एडवर्ड्स – 3 कोटी – सनरायझर्स हैदराबाद
- कूपर कॉनोली – 3 कोटी – पंजाब किंग्स
- वानिंदू हसरंगा – 2 कोटी – लखनऊ सुपर जायंट्स
- रचीन रवींद्र – 2 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- मॅथ्यू शॉर्ट – 1.5 कोटी – चेन्नई सुपर किंग्स
- झॅक फोल्क्स – 75 लाख – चेन्नई सुपर किंग्स
- अमन खान – 40 लाख – चेन्नई सुपर किंग्स
यष्टीरक्षक (Wicketkeepers)
- कार्तिक शर्मा – 14.20 कोटी – चेन्नई सुपर किंग्स
- जोस इंग्लिस – 8.6 कोटी – लखनऊ सुपर जायंट्स
- तेजस्वी सिंग – 3 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- मुकुल चौधरी – 2.6 कोटी – लखनऊ सुपर जायंट्स
- टॉम बँटन – 2 कोटी – गुजरात टायटन्स
- सलिल अरोरा – 1.5 कोटी – सनरायझर्स हैदराबाद
- बेन डकेट – 2 कोटी – दिल्ली कॅपिटल्स
- फिन ॲलन – 2 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- क्विंटन डी कॉक – 1 कोटी – मुंबई इंडियन्स
- टीम सायफर्ट – 1.5 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स
- रवी सिंग – 95 लाख – राजस्थान रॉयल्स
- जॉर्डन कॉक्स – 75 लाख – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
न विकले गेलेले महत्त्वाचे खेळाडू
काही मोठ्या खेळाडूंवर एकाही संघाने बोली लावली नाही, ज्यात प्रामुख्याने जेक फ्रेझर-मॅकगर्क, डेव्हॉन कॉन्वे, जॉनी बेअरस्टो, जेराल्ड कोएत्झी, डॅरिल मिशेल, केएस भरत आणि रहमानउल्ला गुरबाज यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – Uddhav Thackeray: धुरंधरच्या रेहमान डकैतची राजकीय एन्ट्री! उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र शेअर करत शिंदे गटाची टीका









