Home / क्रीडा / Ishan Kishan Marriage: मैदानावर फटकेबाजी अन् आयुष्यात प्रेम! इशान किशन लवकरच अडकणार विवाहबंधनात; कोण आहे होणारी पत्नी?

Ishan Kishan Marriage: मैदानावर फटकेबाजी अन् आयुष्यात प्रेम! इशान किशन लवकरच अडकणार विवाहबंधनात; कोण आहे होणारी पत्नी?

Ishan Kishan Aditi Hundia Marriage : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने मिळवलेल्या दिमाखदार विजयानंतर, आता सर्वत्र सलामीवीर इशान किशनच्या...

By: Team Navakal
Ishan Kishan Marriage
Social + WhatsApp CTA

Ishan Kishan Aditi Hundia Marriage : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने मिळवलेल्या दिमाखदार विजयानंतर, आता सर्वत्र सलामीवीर इशान किशनच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. लवकरच इशान किशन विवाहबंधनात अडकणार आहे.

रिपोर्टनुसार, इशान लवकरच मॉडेल अदिती हुंडियासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. याबाबत इशानच्या आजोबांनी इशान आणि अदिती हुंडिया यांच्या नात्यावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.

आजोबांनी दिली लग्नाला संमती

इशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी सांगितले की, “इशान ज्या मुलीची निवड करेल, ती आम्हाला सून म्हणून मान्य आहे. अदिती त्याची मैत्रीण आहे आणि ती एक प्रसिद्ध मॉडेल आहे. मुलांच्या आनंदातच आमचा आनंद आहे.” अदिती हुंडिया ही 2018 मध्ये मिस दिवा ठरली होती आणि फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट देखील होती. इशानच्या कुटुंबियांशी तिचे जिव्हाळ्याचे संबंध असून, आजोबांच्या मुलाखतीनंतर तिने त्यांचे कौतुकही केले होते.

मैदानातील ‘मिस्ट्री गर्ल’ ते होणारी सून

अदिती आणि इशानच्या अफेअरची चर्चा 2019 च्या आयपीएल दरम्यान सुरू झाली होती. त्यावेळी स्टेडियममध्ये इशानला चियर करताना दिसलेली ही ‘मिस्ट्री गर्ल’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. तेव्हापासून अनेकदा इन्स्टाग्रामवरील त्यांच्या कमेंट्समुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता विश्वचषकानंतर हे जोडपे लग्नगाठ बांधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संघर्षातून इशानचे पुनरागमन

इशान किशनचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मधल्या काळात बीसीसीआयचे केंद्रीय मानधन गमावल्यानंतर आणि संघातून बाहेर पडल्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले आहे.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली अंडर-19 भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या इशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रमही केला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या