Home / क्रीडा / KL Rahul Record: केएल राहुलची ऐतिहासिक खेळी! 46 वर्षात पहिल्यांदाच भारतीय सलामीवीरने कसोटीत केली ‘ही’ कामगिरी

KL Rahul Record: केएल राहुलची ऐतिहासिक खेळी! 46 वर्षात पहिल्यांदाच भारतीय सलामीवीरने कसोटीत केली ‘ही’ कामगिरी

KL Rahul Record: भारताचा सलामावीर फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) सध्या सुरू असलेल्या एंडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेत (Ind vs Eng Test...

By: Team Navakal
KL Rahul Record

KL Rahul Record: भारताचा सलामावीर फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) सध्या सुरू असलेल्या एंडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेत (Ind vs Eng Test Series) ऐतिहासिक कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकताच त्याने मालिकेतील 500 धावांचा टप्पा पार केला.

विशेष म्हणजे, ही परदेशी भूमीवर एका कसोटी मालिकेत भारतीय सलामीवीराने 500 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची 46 वर्षांतील पहिली वेळ ठरली आहे.

केएल राहुलचा 500 धावांचा ऐतिहासिक टप्पा

या कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुलने 46 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने जबरदस्त संयम दाखवत 87धावांवर नाबाद खेळत अर्धशतक झळकावले. यामुळे या मालिकेतील त्याची धावसंख्या आता 501 झाली आहे. 1979 मध्ये सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध 542 धावा केल्या होत्या, त्यानंतर परदेशात असा विक्रम करणारा केएल राहुल पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे.

गावस्कर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत दोन वेळा परदेशी दौऱ्यांमध्ये 500 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर इतक्या वर्षांनी राहुलने ही कामगिरी करत ऐतिहासिक पंक्तीत आपले नाव नोंदवले आहे.

मँचेस्टर कसोटीची घडी आता निर्णायक वळणावर

चौथ्या दिवसाअखेर भारताने 2 गडी गमावून 174 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या पहिल्या डावातील आघाडी अजूनही 137 धावांची आहे. सध्या राहुल 87 वर तर कर्णधार शुभमन गिल 78 धावांवर नाबाद आहेत. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारत ही आघाडी पार करतो का, आणि सामना वाचवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताला ही मालिका जिंकण्याची संधी कायम ठेवायची असेल, तर हा सामना अनिर्णित राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम दिवशी केएल राहुल व गिलची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या