Home / क्रीडा / LSG vs DC IPL 2026: आज लखनौ विरुद्ध दिल्ली भिडणार; कधी व कुठे पाहता येईल सामना? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

LSG vs DC IPL 2026: आज लखनौ विरुद्ध दिल्ली भिडणार; कधी व कुठे पाहता येईल सामना? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

LSG vs DC IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2026 चा थरार आता रंगात आला असून, आज 1 एप्रिल...

By: Team Navakal
LSG vs DC IPL 2026
Social + WhatsApp CTA

LSG vs DC IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2026 चा थरार आता रंगात आला असून, आज 1 एप्रिल रोजी लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) आमनेसामने येणार आहेत.

गेल्या हंगामात दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते, त्यामुळे विजयाने मोहिमेची सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. विशेष म्हणजे, मेगा ऑक्शननंतर केएल राहुल आणि ऋषभ पंत हे पुन्हा एकदा आपापल्या जुन्या संघांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

दोन्ही संघांची ताकद आणि बदल

लखनौच्या संघाने यंदा मोहम्मद शमी आणि अर्जुन तेंडुलकर यांना ट्रेडद्वारे आपल्या ताफ्यात सामील करून गोलंदाजी मजबूत केली आहे. मात्र, वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे आणि जोस इंग्लिस वैयक्तिक कारणास्तव या सामन्यात उपलब्ध नसतील. एनरिच नॉर्टजे आणि निकोलस पूरन यांच्यावर संघाची मदार असेल.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा संघ कागदावर अत्यंत संतुलित दिसत आहे. मिचेल स्टार्क दुखापतीमुळे बाहेर असला तरी, पाथुम निसांका आणि डेव्हिड मिलर यांच्या येण्याने फलंदाजीची बाजू भक्कम झाली आहे. गोलंदाजीची धुरा लुंगी एनगिडी आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल.

मैदानातील आकडेवारी (Head to Head)

  • या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 7 सामने झाले आहेत.
  • यामध्ये दिल्लीने 4 तर लखनौने 3 सामन्यांत विजय मिळवला आहे.
  • इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांपैकी पाहुण्या संघाने 2 वेळा बाजी मारली आहे, तर यजमान लखनौने केवळ 1 सामना जिंकला आहे.

महत्त्वाची माहिती:

  • सामन्याची वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
  • नाणेफेक: संध्याकाळी 7:00 वाजता
  • ठिकाण: इकाना स्टेडियम, लखनौ
  • सर्वाधिक धावा: केएल राहुल (210 धावा)
  • सर्वाधिक बळी: रवी बिश्नोई (10 बळी) आणि कुलदीप यादव (9 बळी)

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड मानले जात असले, तरी घरच्या मैदानाचा फायदा घेऊन लखनौ धक्का देण्यास सज्ज आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या