Home / क्रीडा / दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचा धमाका! पदार्पणाच्या पहिल्या 5 सामन्यातच मोडला नवज्योत सिंग सिद्धूंचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचा धमाका! पदार्पणाच्या पहिल्या 5 सामन्यातच मोडला नवज्योत सिंग सिद्धूंचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड

Matthew Breetzke

Matthew Breetzke Record: दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटपटू मॅथ्यू ब्रीत्झकेने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने सलग पाच अर्धशतकी किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करत इतिहास रचला आहे.

मॅथ्यू ब्रीत्झकेने या कामगिरीसह माजी भारतीय खेळाडू नवज्योत सिंग सिद्धूंचा विक्रम मोडला असून, त्यांच्या नावावर सलग चार अर्धशतकांचा विक्रम होता. 26 वर्षीय ब्रीत्झकेने लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली.

ब्रीत्झकेने मोडला नवज्योत सिंग सिद्धूचा विक्रम

ब्रीत्झकेने यावर्षी फेब्रुवारीमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने न्यूझीलंडविरुद्ध 150 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध 83, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 57 आणि पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 88 धावांची दमदार खेळी केली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 77 चेंडूत 85 धावांची खेळी करत सलग पाचव्यांदा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

म्हणजेच, त्याने पदार्पणाच्या पहिल्या पाचही सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे. यासह त्याने नवज्योत सिंग सिद्धूंचा 38 वर्ष जुना विक्रम मो़डला. या विक्रमी खेळीसह ब्रीत्झकेने आतापर्यंत खेळलेल्या 5 एकदिवसीय सामन्यात 92 च्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत.

एलिट क्लबमध्ये ब्रीत्झकेचा प्रवेश

लग पाच अर्धशतकांपेक्षा जास्त धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या यादीत ब्रीत्झकेने आता दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्याच्या आधी जॉन्टी रोड्स (2000-01), क्विंटन डी कॉक (2017 आणि 2019), आणि हेनरिक क्लासेन (2024-25) यांनी अशी कामगिरी केली आहे. मात्र, ब्रीत्झकेने पदार्पणाच्या पहिल्या 5 सामन्यातच अशी कामगिरी केल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा कोण आहेत?

मंडल वरून शिवसेना सोडली आता मंत्रिपद सोडणार का? राऊतांचा भुजबळांना सवाल

किम-पुतिन भेटीनंतर जोंग यांच्या ग्लाससह खुर्ची व ठशांची सफाई