MS Dhoni Captain Cool Trademark | ‘कॅप्टन कूल’ हा शब्द ऐकताच क्रिकेटप्रेमींच्या मनात एकच नाव येते ते म्हणजे एम.एस. धोनी. त्याच्या शांत आणि संयमी नेतृत्व शैलीने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता धोनी यांनी ‘कॅप्टन कूल’ या नावासाठी ट्रेडमार्क मिळवण्याचा अर्ज दाखल केला होता.
रिपोर्टनुसार, हा अर्ज स्वीकारला गेला असून, 16 जून 2025 रोजी ट्रेड मार्क्स रजिस्ट्रीच्या अधिकृत जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेम 2025 मध्ये समावेश झाला होता.आता त्याने कॅप्टन कूल’ या नावासाठी ट्रेडमार्क मिळवण्याचा अर्ज दाखल केला.
धोनी यांनी ‘कॅप्टन कूल’ हा ट्रेडमार्क खेळाचे प्रशिक्षण, स्पोर्ट्स कोचिंग आणि संबंधित सेवांसाठी (Sports Training and Coaching) नोंदवण्यासाठी अर्ज केला आहे. ट्रेड मार्क्स रजिस्ट्रीच्या पोर्टलनुसार, हा अर्ज ‘स्वीकृत आणि जाहिरात’ स्थितीत आहे.
याचवेळी, ‘प्रभा स्किल स्पोर्ट्स (ओपीसी) प्रा. लि.’ या कंपनीनेही याच नावासाठी अर्ज केला होता, परंतु त्यांच्या अर्जाची स्थिती ‘दुरुस्तीसाठी दाखल’ अशी आहे. भारतात ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज तपासणीनंतर स्वीकारला जातो आणि अधिकृत जर्नलमध्ये प्रकाशित होतो.
धोनींची यशस्वी कारकीर्द
सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा T20 विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच, 2014 च्या T20 विश्वचषकात अंतिम सामना आणि 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली होती.
धोनी यांनी 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले असून, तिन्ही आयसीसी व्हाइट-बॉल ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहेत. 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 183 धावांचा त्यांचा डाव आजही यष्टिरक्षकाची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) अनेकदा विजेतेपद पटकावले आहे. धोनीला त्याच्या मैदानावरील शांत व संयमी नेतृत्वासाठी ओळखले जाते. त्यामुळे त्याला ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखले जात असे. आता हेच नाव ब्रँडसाठी वापरण्यासाठी त्याने ट्रेडमार्क मिळवण्याचा अर्ज दाखल केला