Home / क्रीडा / MS Dhoni Traffic Fine: कॅप्टन कूलला नियमांचा विसर? रांचीत ओव्हर स्पीडिंगमुळे धोनीला बसला दंड

MS Dhoni Traffic Fine: कॅप्टन कूलला नियमांचा विसर? रांचीत ओव्हर स्पीडिंगमुळे धोनीला बसला दंड

MS Dhoni Traffic Fine: मैदानावर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी सध्या मैदानाबाहेर काही अडचणींचा सामना करत...

By: Team Navakal
MS Dhoni Traffic Fine
Social + WhatsApp CTA

MS Dhoni Traffic Fine: मैदानावर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी सध्या मैदानाबाहेर काही अडचणींचा सामना करत आहे. अवघ्या एका आठवड्यात धोनीला प्रशासनाकडून दोन मोठे धटके बसले आहेत. रांची ट्रॅफिक पोलिसांनी धोनीला ओव्हर स्पीडिंगसाठी दंड ठोठावला असून, त्याच वेळी त्याच्या घराच्या वापराबाबत गृहनिर्माण मंडळानेही गंभीर नोटीस बजावली आहे.

91 च्या वेगाने धावली गाडी!

1 मार्च रोजी रांचीच्या कांके रिंग रोडवर बिरसा कृषी विद्यापीठाजवळ धोनीची लक्झरी कार ताशी 91 किलोमीटर वेगाने धावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या रस्त्यावर वेगाची मर्यादा ताशी 60 किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी धोनीला 1,000 रुपयांचा ई-चलाण पाठवला आहे.

“कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो सामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी,” असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. धोनीच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या कार आणि बाईक्स आहेत, मात्र यावेळी वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याला दंड भरावा लागला आहे.

निवासाच्या जागेचा व्यावसायिक वापर?

ट्रॅफिक दंडाच्या आधी, मागील आठवड्यात झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने धोनीला एक नोटीस बजावली होती. रांचीच्या हरमू परिसरात धोनीला राहण्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडावर (H-10A) व्यावसायिक उपक्रम सुरू असल्याचा आरोप मंडळाने केला आहे. नियमानुसार हा भूखंड केवळ निवासासाठी वापरणे बंधनकारक आहे, मात्र तिथे सध्या एक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालवली जात असल्याचे समोर आले आहे.

प्लॉट रद्द होण्याची टांगती तलवार

गृहनिर्माण मंडळाने धोनीला यावर स्पष्टीकरण मागितले आहे. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर या भूखंडाचे वाटप रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते, असा इशारा नोटिशीमध्ये देण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांवर धोनी किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, रांची शहरात सध्या या दोन घटनांचीच मोठी चर्चा रंगली आहे.

हे देखील वाचा – Finn Allen Record: ‘युनिव्हर्स बॉस’चा विक्रम मोडीत! फिन्न ॲलनचे ऐतिहासिक वादळ; अवघ्या 33 चेंडूत ठोकले सर्वात वेगवान शतक

Web Title:
संबंधित बातम्या