Home / क्रीडा / सामना चालू असतानाच नितीश राणा-दिग्वेश राठी एकमेकांना भिडले, मैदानातच झाला मोठा वाद

सामना चालू असतानाच नितीश राणा-दिग्वेश राठी एकमेकांना भिडले, मैदानातच झाला मोठा वाद

Nitish Rana Digvesh Rathi Fight Video

Nitish Rana Digvesh Rathi Fight Video: क्रिकेटपटू दिग्वेेश राठी आयपीएलमध्ये त्याच्या ‘ट्रेडमार्क नोटबुक सेलिब्रेशन’मुळे चांगला चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा दिल्ली प्रीमियर लीग 2025 च्या सामन्यात झालेल्या वादामुळे दिग्वेश चर्चेत आला आहे.

दिल्ली प्रीमियर लीग 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्स आणि साउथ दिल्ली सुपरस्टारझ यांच्यातील सामना खेळाडूंच्या वादामुळे चर्चेत आला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंचे मैदानावर एकमेकांसोबत वारंवार शाब्दिक वाद झाले.

सुमित माथुर आणि क्रिश यादव यांच्यातील वादानंतर, नितीश राणा आणि दिग्वेेश राठी यांच्यातही मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय घडले मैदानात?

हा सर्व प्रकार दिग्वेश राठीच्या गोलंदाजीदरम्यान घडला. राठीने गोलंदाजीच्या ॲक्शनमध्ये असतानाच अचानक थांबा घेतला, ज्यामुळे राणाला स्वीप शॉट मारण्यासाठी अडचण आली. राठीने आयपीएल 2025 मध्येही लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना असे अनेकदा केले होते. यामुळे नाराज झालेल्या राणा देखील पुढच्या चेंडूवर गोलंदाजी सुरू होण्यापूर्वीच मागे हटला.

पुढच्या चेंडूवर राणाने रिव्हर्स स्वीप मारत षटकार ठोकला आणि राठीचा ‘ट्रेडमार्क नोटबुक सेलिब्रेशन’ आपल्या बॅटवर करून त्याला डिवचले. यानंतर दोन्ही खेळाडूंची एकमेकांशी झुंपल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मध्यस्थी करून त्यांना एकमेकांपासून दूर केले.

राणाचे शतक

या सामन्यात कर्णधार नितीश राणाने जबरदस्त फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने 55 चेंडूंमध्ये नाबाद 134 धावांची खेळी केली. राणाच्या या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट दिल्ली लायन्सने 202 धावांचे लक्ष्य 7 विकेट्स राखून आणि 17 चेंडू शिल्लक असतानाच सहज पार केले.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

TikTok India: ‘टिकटॉक’ची भारतात नोकरभरती सुरू, कंपनीची पुन्हा एन्ट्री होणार की केवळ अफवा?

Gokul Milk Price: बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ

‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…