Rajasthan Royals : आयपीएल (IPL)स्पर्धेच्या आधीच राजस्थान रॉयल्स च्या संघात अनेक बदल होत असून राहुल द्रवीड (Rahul Dravid) व संजू सॅम्पसन (Sanju Samson)यांच्या पाठोपाठ संधाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक लश मैक्रम (Jack Lush McCrum) यांनीही राजीनामा दिला आहे. गेल्या वेळेसच्या आयपीएलमध्ये संघाच्या वाईट कामगिरीनंतर हे बदल होत आहेत
.यातील संजू सॅम्पसन यांनी अधिकृतपणे संघ सोडला नसला तरी ते संघापासून दूरच आहेत. त्यातच राहुल द्रविडने संघाच्या प्रशिक्षक पदावरुन राजीनामा दिला. गेल्यावेळी या संघाचे मार्केटिंग प्रमुख द्विजेंदर पराशर यांनीही राजीनामा दिला होता.
आता त्यानंतर सीईओंनी राजीनामा दिला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ते संघापासून पूर्णपणे वेगळे झालेले दिसतील. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या लिलावाच्या वेळेसही ते गैरहजर राहिले होते. लिलावात कुमार संगकारा यांनी खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी उचलल्यामुळे यापुढे तेच संघाचे प्रमुख प्रशिक्षक होतील असे म्हटले जात आहे. राजस्थान रॉयल्स संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएल चषक जिंकता आलेला नाही.
हे देखील वाचा
Asia Cup 2025: भारत आणि UAE मधील सामना कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून घ्या
जीएसटी कपातीमुळे Jeep च्या गाड्या स्वस्त; खरेदीवर लाखो रुपयांची बचत, जाणून घ्या नवीन किंमती
चाकाखाली लिंबू चिरडणे पडले महागात; Mahindra Thar थेट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण