IPL 2025 | रियान परागने 6 चेंडूत ठोकले 6 षटकार, ते जुने ट्विट व्हायरल

Riyan Parag IPL Record

Riyan Parag IPL Record | राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार रियान परागने (Riyan Parag) ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) तुफानी फलंदाजी केली. त्याने आयपीएलमध्ये इतिहास रचताना सलग 6 चेंडूत 6 षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.

परागने 95 धावांची वादळी खेळी करत संघाला विजयाच्या जवळजवळ नेले होते, पण अखेरीस केकेआरने 1 धावेने रोमांचक विजय मिळवला. परागच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

परागने 13 व्या षटकात मोईन अलीला लक्ष्य केले आणि त्याच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकले. परागच्या या फटकेबाजीने मोईन आणि केकेआरचे खेळाडूही चकित झाले. त्यानंतर त्याने पुढील षटकात वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) चेंडूवर षटकार मारला. अशाप्रकारे सलग 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्याची कामगिरी केली.

रियानच्या या कामगिरीनंतर त्याचे दोन वर्षांपूर्वीचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परागने दोन वर्षांपूर्वी 2023 मध्येही एका षटकात 4 षटकार मारण्याची भविष्यवाणी केली होती. त्याने X (ट्विटर) वर आयपीएल 2023 पूर्वी याबाबत पोस्ट केले होते. हे ट्विट आता व्हायरल होत आहे.नंतर, त्याने वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) चेंडूवर षटकार मारला.

आता रियान पराग आयपीएलच्या एका षटकात 5 षटकार मारणाऱ्या ख्रिस गेल (Chris Gayle – 2012), राहुल तेवतिया (Rahul Tewatia – 2020), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja – 2021) आणि रिंकू सिंग (Rinku Singh – 2023) यांच्या elite यादीत सामील झाला.

दरम्यान, केकेआरच्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रियान पराग 45 चेंडूत 95 धावा करून 18 व्या षटकात बाद झाला. या सामन्यात राजस्थानचा संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 205 धावांपर्यंतच मजल मारू शकला.