Home / क्रीडा / विश्वचषक विजेत्या’ या’ 22 वर्षीय महिला क्रिकेपटूची थेट DSP पदावर नियुक्ती; सरकारने केले सन्मानित

विश्वचषक विजेत्या’ या’ 22 वर्षीय महिला क्रिकेपटूची थेट DSP पदावर नियुक्ती; सरकारने केले सन्मानित

Richa Ghosh DSP : भारतासाठी महिला विश्वचषक (Women’s World Cup) जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष (Richa Ghosh) हिला...

By: Team Navakal
Richa Ghosh DSP
Social + WhatsApp CTA

Richa Ghosh DSP : भारतासाठी महिला विश्वचषक (Women’s World Cup) जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष (Richa Ghosh) हिला पश्चिम बंगाल सरकारने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर मोठ्या समारंभात सन्मानित केले. सिलीगुडीची रहिवासी असलेल्या रिचा विश्वचषक जिंकणारी बंगालची पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

सरकार आणि CAB कडून मोठा सन्मान

या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रिचाला राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बंगा भूषण’ (Banga Bhushan) पुरस्कार प्रदान केला. तसेच, रिचाची थेट पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) या पदावर नियुक्ती करणारे पत्र आणि सोन्याची साखळीही भेट दिली.

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) आयोजित केलेल्या या कार्यक्रमात CAB ने रिचाला 34 लाख रुपयांचा चेक दिला. अंतिम सामन्यात रिचाने केलेल्या प्रत्येक धावेसाठी 1 लाख रुपये याप्रमाणे हे बक्षीस देण्यात आले आहे.

विश्वचषकातील रिचाची निर्णायक कामगिरी

रिचाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 24 चेंडूंत 34 धावांची (तीन चौकार आणि दोन षटकार) महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तिच्या या योगदानामुळे भारतीय संघाने 298/7 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले, ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर ऑलआऊट झाला.

संपूर्ण स्पर्धेत रिचाची फलंदाजी जबरदस्त होती. 8 डावांमध्ये तिने 39.16 च्या सरासरीने आणि 133.52 च्या स्ट्राइक रेटने 235 धावा केल्या. हा स्ट्राइक रेट भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक होता. याशिवाय, तिने एकाच महिला विश्वचषकात 12 षटकार मारण्याचा डिएन्ड्रा डॉटिनचा विक्रमही मोडला.

रिचाच्या या सन्मान सोहळ्याला बंगाल महिला क्रिकेट आयकॉन झुलन गोस्वामी, राज्य क्रीडामंत्री अरूप बिस्वास, खासदार मिमी चक्रवर्ती आणि रिचाचे आई-वडील मानबेंद्र आणि स्वप्ना घोष उपस्थित होते.


हे देखील वाचा –

वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण! मोदींनी गायला वगळलेला भाग

Web Title:
संबंधित बातम्या