Rohit Sharma Tesla Model Y: भारतात टेस्लाच्या कारची विक्री सुरू झाल्यापासून अनेकजण आता ही गाडी खरेदी करत आहे. नेत्यांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत अनेकजण Tesla Model Y ही इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहे. रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने देखील नुकतेच टेस्ला मॉडेल Y (Tesla Model Y) खरेदी केले आहे. विशेष म्हणजे रोहितच्या या गाडीचा नंबर खास आहे.
रोहित शर्माने खरेदी केले टेस्ला मॉडेल Y
रिपोर्टनुसार,, रोहित शर्माने नुकतीच टेस्ला मॉडेल Y ही कार घरी आणली आहे. यामुळे तो इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे.
एका युजरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित त्याच्या या नवीन कारमधून बाहेर पडताना दिसतो.
Rohit Sharma has bought a new Tesla electric car, and just like his previous car, he has chosen its number based on his children’s birth dates. 🥹❤️
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 7, 2025
3015 🤍 pic.twitter.com/TqBAIA4RKq
कारचा नंबर 3015
रोहित शर्माच्या या नवीन कारबद्दल सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे तिचा खास नंबर – 3015. हा आकडा रोहितसाठी खास आहे. यात त्याची मुलगी समायरा (जन्म 30 डिसेंबर) आणि मुलगा अहान (जन्म 15 नोव्हेंबर) यांच्या जन्म तारखांचा समावेश आहे.
या दोन्ही तारखा एकत्र करून त्याने हा खास 3015 युनिक नंबर आपल्या गाडीसाठी निवडला आहे. विशेष म्हणजे, त्याची दुसरी आलिशान कार लॅम्बोर्गिनी उरुस एसई (Lamborghini Urus SE) वर देखील हाच 3015 नंबर आहे.
Rohit Sharma drives Tesla Electric Car; chooses number plate on his children’s birth dates pic.twitter.com/mG8gmSWJ2Q
— SportsTiger (@The_SportsTiger) October 8, 2025
टेस्ला मॉडेल Y ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि किंमत
- उत्कृष्ट ड्रायव्हिंग रेंज: यात 60 kWh बॅटरी पॅकसह 500 किमी (WLTP प्रमाणित) आणि 75 kWh लाँग रेंज व्हेरिएंटसह 622 किमी प्रति चार्जपर्यंतची रेंज उपलब्ध आहे.
- दमदार परफॉर्मन्स: मागील बाजूस असलेल्या 295 bhp पॉवरच्या मोटरमुळे ही कार केवळ 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी/तास इतका वेग पकडते.
- फास्ट चार्जिंग: टेस्लाच्या ‘सुपरचार्जिंग नेटवर्क’चा वापर करून अवघ्या 15 मिनिटांत 238 ते 267 किमीपर्यंतची रेंज मिळू शकते.
- प्रगत फीचर्स: यात 15.4-इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, गरम आणि हवेशीर सीट्स, नऊ-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, टिंटेड काचेचे छत आणि ‘फुल सेल्फ-ड्राइव्हिंग’ सारखे प्रगत फीचर्स आहेत.
- किंमत: जुलै 2025 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या या कारची एक्स-शोरूम किंमत स्टँडर्ड मॉडेलसाठी 59.89 लाख रुपयांपासून सुरू होते आणि लाँग रेंज मॉडेलसाठी 67.89 लाख रुपयांपर्यंत आहे.
हे देखील वाचा – Rinku Singh: क्रिकेटर रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी! दाऊद टोळीने 5 कोटींची खंडणी मागितल्याचे उघड; दोन आरोपींना अटक