Home / क्रीडा / Rohit Sharma: 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला…

Rohit Sharma: 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला…

Rohit Sharma on 2027 World Cup: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेक महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे....

By: Team Navakal
Rohit Sharma on 2027 World Cup

Rohit Sharma on 2027 World Cup: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेक महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. रोहित या मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. मात्र, त्याने आता 2027 मध्ये होणारा वर्ल्ड कप खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याने आपल्या 50 षटकांच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल सुरू असलेल्या महिन्याभराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका चाहत्याशी बोलताना एका व्हायरल व्हिडिओमध्ये रोहितने 2027 मध्ये होणाऱ्या ICC एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, भारताला हे विजेतेपद मिळवून देण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे त्याने सांगितले.

जेव्हा एका चिमुकल्या चाहत्याने रोहितला विचारले की, “पुढचा एकदिवसीय विश्वचषक कधी आहे?” आणि “तुम्ही तो खेळणार आहात का?”, तेव्हा 38 वर्षीय या अनुभवी सलामीवीराने हसून होकार दिला आणि “होय, मी खेळू इच्छितो,” असे आश्वासन दिले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Rohit Sharma: ऑस्ट्रेलिया दौऱ्याकडे लक्ष

रोहितने T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर T20I मधून निवृत्ती घेतली आणि या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटपासूनही दूर झाला. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेट हा त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एकमेव सक्रिय फॉर्मेट राहिला आहे.

विराट कोहलीसाठीही हीच स्थिती आहे. 2023 च्या विश्वचषकात भारतीय संघ रोहितच्या नेतृत्व करताना अंतिम फेरीत पोहोचला, पण ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

मात्र, ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कठोर प्रशिक्षण घेऊन जवळपास 10 किलो वजन कमी केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, 19 ऑक्टोबर पासून पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर सुरू होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची महत्त्वाची ठरेल. तसेच, त्याची कामगिरी 2027 च्या वर्ल्ड कपच्या दिशेने देखील महत्त्वाची ठरणार आहे.

हे देखील वाचा T20 World Cup 2026 : २०२६ टी-२० वर्ल्ड कपसाठी शेवटचा पात्र ठरलेला संघ कोणता?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या